Maratha Reservation : आरक्षणाच्या मागणीसाठी राजकीय नेत्यांना गावबंदी; गावकऱ्यांनी घेतली शपथ

Nanded News : आरक्षणाच्या मागणीसाठी राजकीय नेत्यांना गाव बंदी; गावकऱ्यांनी घेतली शपथ
Maratha Reservation
Maratha ReservationSaam tv
Published On

संजय सूर्यवंशी

नांदेड : मागील महिनाभरापासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरु आहे. यात मराठा आरक्षणासाठी (Maratha Aarkshan) मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला अल्टिमेटम संपल्याने मराठा समाज आक्रमक झाला आहे. या दरम्यान आता आरक्षणाच्या (Nanded) मुद्द्यावरून राजकीय नेत्यांना गावबंदी करण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला असून तशी शपथ गावकऱ्यांनी घेतली आहे. (Maharashtra News)

Maratha Reservation
Durga Devi Visarjan 2023 : जनरेटरच्या स्फोटानंतर जिवाच्या आकांताने ओरडत होते सात चिमुकले, दुर्गादेवी विसर्जन मिरवणुकीस गालबाेट

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला अल्टिमेटम दिला होता. तो संपल्याने आता जरांगे पाटील यांनी आजपासून पुन्हा बेमुदत उपोषण सुरु केले आहे. यानंत नांदेड जिल्ह्यातील अनेक गावात राजकीय नेत्यांना गाव बंदी घालण्यात आलीय. नांदेडच्या पवाडेवाडी गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी (Maratha Reservation) राजकीय नेत्यांना गाव बंदी घालण्यात आली. गाव बंदीचा फलक देखील गावात लावण्यात आला. त्यासोबत गावकऱ्यांनी नेत्यांना गावात येऊ न देण्याची शपथ घेतली आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Maratha Reservation
Durga Devi Visarjan: दुर्गादेवी विसर्जनाला गेलेल्या युवकाचा गाडी खाली येऊन मृत्यू

गावात साखळी उपोषण 

पावडेवाडीसह नांदेड जिल्ह्यातील अनेक गावात आजपासून साखळी उपोषण आणि आमरण उपोषणाला सुरुवात झाली. मराठा आरक्षण जोपर्यंत मिळणार नाही, तोपर्यंत राजकीय नेत्यांना गावात बंदी असेल अशी भूमिका पवाडेवाडी येथील गावकऱ्यांनी घेतली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com