Nanded Police : अवैध वाळू माफियांचे धाबे दणाणले; दुचाकीवर जात पोलीस अधीक्षकांची कारवाई, २ कोटी रुपयांचे साहित्य जप्त

Nanded News : नांदेड जिल्ह्यातील वाहेगाव याठिकाणी वाळूचे उत्खनन सुरू असल्याची गुप्त माहिती नांदेड पोलिसांना मिळाली. माहितीची खातरजमा करून नांदेड पोलिसांनी पहाटे पाच वाजल्यापासून कारवाईस सुरवात
Nanded Police
Nanded PoliceSaam tv
Published On

संजय सुर्यवंशी
नांदेड
: अवैध वाळूची वाहतूक डोकेदुखी ठरत आहे. बंदी असताना देखील वाळूचा उपसा करण्यात येत असतो. यातच नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध रेतीचे उत्खनन सुरू आहे. अशाच प्रकारे उत्खनन केले जात असताना नांदेड पोलिसांनी या ठिकाणी पहाटेच्या सुमारास धाड टाकत कारवाई केली आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईत तब्बल २ कोटी रुपयांचे साहित्य जप्त केले आहे. 

नांदेड जिल्ह्यातील वाहेगाव याठिकाणी पोलिसांनी कारवाई केली आहे. वाहेगाव येथे वाळूचे उत्खनन सुरू असल्याची गुप्त माहिती नांदेड पोलिसांना मिळाली. या माहितीची खातरजमा करून नांदेड पोलिसांनी पहाटे पाच वाजल्यापासून कारवाईस सुरवात करत दुपारी तीन वाजेपर्यंत ही कारवाई चालली. स्वतः पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार हे कारवाईसाठी उतरले असल्याने वाळू माफियांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. 

Nanded Police
Fraud Case : शेती अनुदान देण्याच्या नावाने फसवणूक; वृध्द महिलेस दोन लाख १५ हजार रुपयांत गंडविले

दुचाकीवर जात पोलीस अधीक्षकांची कारवाई  

दरम्यान घटनास्थळी उत्खनन सुरु असलेल्या ठिकाणी पोलिसांनी एकाच ठिकाणाहून १७ इंजन, १० बोट, ३० तराफे, एक जेसीबी असा सुमारे दोन कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर घटनास्थळी चारचाकी वाहनाने जाणे शक्य नसल्याने पोलीस अधीक्षक दुचाकीवर बसून गेले. तर याप्रकरणी विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्याचे काम पोलिसांकडून सुरु आहे. 

Nanded Police
IND Vs ENG ODI Match : सोशल मीडियावरून क्रिकेट सामन्याच्या तिकिटांचा काळाबाजार; नागपुरातून दोन तरुण ताब्यात

प्रत्येक ठिकाणी होणार कारवाई 

रेती नियंत्रणाची जबाबदारी महसूल विभागावर असताना महसूल विभाग मात्र कारवाईमध्ये फारसे स्वारस्य दाखवत नाही. ज्या भागात रेती उत्खनन मोठ्या प्रमाणात सुरू होते. त्या भागातील तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार यांच्यावर शासन आता काय कारवाई करते याकडे लक्ष लागले आहे. जिल्ह्यात अवैध रेती उत्खनन जिथे सुरू असेल त्या प्रत्येक ठिकाणी कारवाई केली जाईल; असे पोलीस अधीक्षकांनी सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com