Nanded: सहा तालुक्यात अतिवृष्टी; शेकडो हेक्टरवरील पिके पाण्याखाली, खासदार चिखलीकरांची पाहणी

सहा तालुक्यात अतिवृष्टी; शेकडो हेक्टरवरील पिके पाण्याखाली, खासदार चिखलीकरांची पाहणी
Heavy Rain
Heavy RainSaam tv
Published On

नांदेड : जिल्‍ह्यातील सहा तालुक्यातील ९ मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. अतिवृष्‍टी झाल्‍याने शेकडो हेक्‍टरवरील पिके पाण्याखाली गेले आहेत. यामुळे शेतकरी (Farmer) संकटात सापडला आहे. (nanded news Heavy rains in six talukas Crops on hundreds of hectares under water)

Heavy Rain
Nandurbar: आश्रम शाळेला पुराचा वेढा; दोनशे विद्यार्थ्यांना हलविले प्राथमिक आरोग्य केंद्रात

नांदेड (Nanded) जिल्‍ह्यात सर्वाधिक अतिवृष्टी उमरी तालुक्यातील धानोरा सर्कलमध्ये झाली आहे. तर धानोऱ्यात २४ तासांत १३० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. बिलोली तालुक्यातील चार सर्कलमध्ये ९०, किनवट तालुक्यातील शिवणी येथे १०२, माहूरमध्ये ८०, कंधारमध्ये ७७ तर नायगावमध्ये ७० असे नऊ सर्कलमध्ये (Heavy Rain) अतिवृष्टीची नोंद झाली आहे. या अतिवृष्टीमुळे शेतांना तळ्याचे स्वरुप आले आहे. शेकडो हेक्टरवरील जमीनीवरील पिके वाहून गेली आहेत. नाले, रस्ते, ओढ्यावरुन पाणी जात आहे. शेतकऱ्यांनी नुकसानीची पाहणी करून तातडीने मदत करण्याची शासनाकडे मागणी केली आहे.

खासदार चिखलीकरांकडून अतिवृष्टी भागाचा दौरा

नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागांचा पाहणी दौरा केला. जिल्ह्यात पावसाने मोठा कहर केला. शेकडो हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली. शेतात गुडघाभर पाणी साचल्याने खरीपाचे पिकं वाया गेली आहेत. खासदार चिखलीकर आणि आमदार कल्याणकर यांनी नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन शासनाकडे अहवाल सादर करण्याचे निर्देश प्रशासनाला दिलेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com