Nanded News: वादळी वाऱ्यासह गारपिटीने मोठे नुकसान; फळ बागा उन्‍मळून पडल्‍या

वादळी वाऱ्यासह गारपिटीने मोठे नुकसान; फळ बागा उन्‍मळून पडल्‍या
Nanded News
Nanded NewsSaam tv
Published On

संजय सूर्यवंशी

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यात रविवारी सायंकाळी झालेल्या (Nanded News) वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. अचानक सुरू झालेल्या वादळी वारा, पाऊस (Rain) आणि गारपिटीने बिलोली शहरासह परिसराला झोडपले. (Maharashtra News)

Nanded News
Leopard Attack: थरारक..बिबट्याच्‍या जबड्यातून सुटला; सरपण गोळा करायला गेला असता हल्‍ला

अचानक आलेल्या पावसामुळे रविवारच्या आठवडी बाजारात मोठी धावपळ उडाली होती. तर दुसरीकडे वादळी वाऱ्यामुळे काही कौलारू घरांच्या भिंती कोसळल्या. अनेक घरांवरील पत्रे उडून अनेकांचे संसार उघड्यावर आले आहे. गारपिट आणि वादळी वाऱ्यामुळे (farmer) शेतकर्यांचेही मोठे नुकसान झाले.

Nanded News
Sangli Gutkha Seized: तब्बल एक कोटी १७ लाखाचा गुटखा जप्त

आंबा, चिकूसह अन्य फळ बागांची झाडे उन्मळून पडली आहेत. वादळी वाऱ्याचा महावितरणला ही मोठा फटका बसला. अनेक ठिकाणी विद्युत खांब कोसळले असून वीजपुरवठा खंडित झाला होता. तर शहरातील मराठवाडा राईल मिलवरील टिन शेड उडाल्याने धान वाळू घालायच्या येंत्रासह धानाचे मोठे नुकसान झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com