Nanded News: सहलीसाठी गेल्या अन् झाला घात, पैनगंगा नदीत बुडून ३ मुलींचा मृत्यू

Nanded Painganga River: मारेगाव येथील एक कुटुंब आपल्या मुलांसोबत पैनगंगा नदीवर सहलीसाठी आले होते. याचवेळी पैनगंगा नदीमध्ये पोहत असताना ३ मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
Nanded News: सहलीसाठी गेल्या अन् झाला घात, पैनगंगा नदीत बुडून ३ मुलींचा मृत्यू
Nanded Painganga RiverSaam Tv

संजय सूर्यवंशी, नांदेड

नांदेडमध्ये पैनगंगा नदीमध्ये बुडून ३ मुलींचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या मुली आपल्या कुटुंबीयांसोबत सहलीसाठी गेल्या होत्या. त्याचवेळी पैनगंगा नदीमध्ये (Painganga River) पोहण्यासाठी उतरले असता पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्यांचा पाण्यामध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्या आहेत. या मुलींचे मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आले आहेत. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नांदेडच्या किनवट तालुक्यातील पैनगंगा नदीवर सहलीसाठी मारेगाव येथील एक कुटुंब आले होते. यावेळी मारेगाव शिवारात पोहत असताना नदीच्या पाण्यात बुडून तिघींचा मृत्यू झाला. आज दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये दोन सख्ख्या बहिणींचा समावेश आहे.

Nanded News: सहलीसाठी गेल्या अन् झाला घात, पैनगंगा नदीत बुडून ३ मुलींचा मृत्यू
Pune Porsche Accident : पैशांची देवाण-घेवाण आणि पुराव्यांची अफरातफर! पुणे अपघात प्रकरणातील आरोपींना 4 दिवसांची पोलिस कोठडी

ममता शेख जावेद (वय 21 वर्षे), पायल देविदास कांबळे (वय 16 वर्षे) आणि तिची बहीण स्वाती देविदास कांबळे अशी पैनगंगा नदीत बुडून मृत्यू झालेल्या मुलींची नावं आहेत. या मुली आपल्या कुटुंबीयांसोबत सहलीसाठी याठिकाणी आल्या होत्या. ममता, पायल आणि स्वाती या तिघी आणि इतर काही जण पोहण्यासाठी नदीमध्ये गेले होते. तिघीही नदीत एकमेकांवर पाणी टाकत पोहण्याचा आनंद घेत होत्या.

Nanded News: सहलीसाठी गेल्या अन् झाला घात, पैनगंगा नदीत बुडून ३ मुलींचा मृत्यू
Mumbai Police Threat Call: ताज हॉटेल, मुंबई विमानतळसह इतर ठिकाणी बॉम्ब ठेवलाय; पोलीस कंट्रोल रुमला धमकीचा फोन

नदीमध्ये पोहण्याचा आनंद घेत मस्ती करत असताना यामधील एक जण नदीमध्ये बुडू लागली. तिला वाचवण्यासाठी गेलेल्या इतर दोघीही बुडाल्या. पोहता येत नसल्यामुळे या तिघींचा देखील नदीमध्ये बुडून मृत्यू झाला. तर पोहता येत असलेली एक महिला नदीतून सुखरूप बाहेर आली. या घटनेमध्ये दोन मुलींना गमावल्यामुळे कांबळे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. स्थानिक प्रशासन आणि गावकऱ्यांच्या मदतीने तिघींचे मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आले आहेत.

Nanded News: सहलीसाठी गेल्या अन् झाला घात, पैनगंगा नदीत बुडून ३ मुलींचा मृत्यू
Mumbai Rain: मुंबईकरांची उकाड्यापासून सुटका होणार; शहरात हलक्या पावसाच्या सरी बरसणार, हवामान विभागानं काय सांगितलं?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com