Nanded News: दोन वर्षांपासून थकवले १५० कोटी; शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न

Nanded News दोन वर्षांपासून थकवले १५० कोटी; शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न
Nanded News
Nanded NewsSaam tv

संजय सूर्यवंशी

नांदेड : इंडिया मेगा अग्रो कंपनीने ८०० शेतकऱ्यांचे दीडशे कोटी रुपये थकवले आहेत. हि थकलेली रक्कम (Nanded) तात्काळ देण्याच्या मागणीसाठी संतप्त शेतकऱ्यांनी (Farmer) आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी शेतकऱ्यांना रोखल्याने पुढील अनर्थ टळला आहे. (Maharashtra News)

Nanded News
Satara News: दारू विक्री सुरू करण्याचा बहुमताने ठराव; जावलीत बैठक घेत आवाजी मतदान

कृष्णुर तालुका नायगाव येथील इंडिया मेगा ऍग्रो कंपनीने ८०० शेतकऱ्यांचा शेतमाल विकत घेतला होता. हरभरा, सोयाबीन, मटकी, हळद इत्यादी माल २०२१ मध्ये खरेदी केला होता. मात्र मुदत संपून दोन वर्ष लोटली, तरीपण शेतकऱ्यांना दीडशे कोटी रुपये मिळाले नाही. त्यामुळे तीन जून २०२१ रोजी कंपनीच्या गेट समोर आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी अर्ध नग्न आंदोलन केले होते. परंतु कंपनीने पैसे दिले नाही. 

Nanded News
Vijaykumar Gavit News: बालमृत्यू, माता मृत्यू झाले त्या भागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री विजयकुमार गावित यांनी दिले संकेत

दरम्यान १४ ऑगस्टला शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार आज रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशअध्यक्ष पांडुरंग शिंदे यांच्यासह शेतकऱ्यांनी सामूहिक आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. परंतु घटनेच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त होता. पोलिसांनी या शेतकऱ्यांना रोखल्याने पुढील अनर्थ टळला. पोलिसांनी या शेतकऱ्यांना ताब्यात घेतले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com