Nanded News : एका लग्नाची दैना! वऱ्हाडी जेवताना सोसाट्याचा वारा, एका झटक्यात लग्नाचा मंडप हवेत, लोकांनी मात्र...; VIDEO

Nanded Wedding Tent Blown Up Video : लग्न मंडप उडून गेल्याने वऱ्हाडी मंडळीची चांगलीच धावपळ उडाली. या घटनेत काही जण किरकोळ जखमी देखील झाल्याची माहिती आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.
Wedding Tent blown up video viral
Wedding Tent blown up video viralSaam Tv News
Published On

संजय सूर्यवंशी, साम टीव्ही

नांदेड : नांदेड जिल्ह्यात मागील दोन ते तीन दिवसापासून सतत वादळी वाऱ्याने थैमान. आज देखील सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्याने थैमान घातलं. नांदेडच्या मुखेड तालुक्यातील कमला नगर तांडा येथे वादळी वाऱ्यामुळे लग्न मंडप उडून गेला आहे. लग्न मंडप उडून गेल्याने वऱ्हाडी मंडळीची चांगलीच धावपळ उडाली. या घटनेत काही जण किरकोळ जखमी देखील झाल्याची माहिती आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दिसत आहे, की एवढं घडूनसुद्दा काही लोकं निवांत बसून जेवण करताय.

दरम्यान, पिंपरी चिंचवड शहरात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. सकाळपासून शहरात पावसाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, दुपारी तीन वाजेच्या दरम्यान अचानक मुसळधार पाऊस आल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. आज सलग दुसऱ्या दिवशी पिंपरी चिंचवड शहरात मुसळधार अवकाळी पाऊस पडत आहे. मात्र, पहिल्याच दिवशी शहरात साचलेल्या पाण्यामुळे महापालिकेच्या कामांची पोलखोल झाली आहे. संपूर्ण शहरात पाणीच पाणी साचलं असून पावसाळ्यात असाच मोठा पाऊस झाला तर संपूर्ण शहर तुंबण्याची भीती आता नागरिकांना पडली आहे.

Wedding Tent blown up video viral
Pune Crime : तरुणीकडून ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा देणारी पोस्ट शेअर, फोटो व्हायरल; पुण्यात खळबळ

उत्तर पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यांतील विविध गावांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी मुसळधार पाऊसाला सुरुवात झालीय. गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात निर्माण झालेला उकाडा या पावसामुळे काहीसा कमी झाला असला, तरी शेती आणि पशुधनाचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली असून अचानक सुरु झालेल्या पाऊसाने शेतकऱ्यांची चांगली धावपळ सुरु झाली.

Wedding Tent blown up video viral
Washim: ४ दिवसांपूर्वी लग्न, अंगावरची हळद ओलीच, सीमेवरून बोलावणं आलं; कृष्णा अंभोरे कर्तव्यावर रवाना

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com