Nanded News : पैसे घ्या पण कामे करा; गळ्यात नोटांचा हार, समोर स्पीकरवर रेकॉर्डिंग; नांदेडमध्ये महिला सरपंचाचं अनोखं आंदोलन

Nanded Female Sarpanch Movement : महिला सरपंचाने अनेक वेळा जिल्हा परिषद कार्यालयामध्ये विविध मागण्यांसाठी निवेदन दिली. परंतु त्या मागण्ंयाकडे जिल्हा परिषद प्रशासनाने साफ दुर्लक्ष केल्याचा आरोप या महिला सरपंचाने केला आहे.
Injegaon Sarpanch Muktai Panchalinge protested
Injegaon Sarpanch Muktai Panchalinge protested Saam Tv News
Published On

नांदेड : जिल्हा परिषद कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये कुठलेही काम होत नसल्याने अखेर महिला सरपंचाने चक्क गळ्यात नोटांचा हार घालून जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केलं आहे. पैसे दिल्याशिवाय कुठलंही काम जिल्हा परिषद कार्यालयातील अधिकारी करत नाहीत, असा आरोप या महिला सरपंचाचा आहे. नांदेड तालुक्यातील इंजेगाव येथील मुक्ताई पंचलिंगे असं या आंदोलन करणाऱ्या महिलेचं नाव आहे.

या महिला सरपंचाने अनेक वेळा जिल्हा परिषद कार्यालयामध्ये विविध मागण्यांसाठी निवेदन दिली. परंतु त्या मागण्ंयाकडे जिल्हा परिषद प्रशासनाने साफ दुर्लक्ष केल्याचा आरोप या महिला सरपंचाने केला आहे. नांदेड पंचायत समितीसाठी कायमस्वरूपी गटविकास अधिकारी मिळत नाहीये. गावात स्मशानभूमी नाहीये, अंगणवाडीसाठी इमारत देखील नाहीये, अशा विविध समस्या गावांमध्ये आहेत. जिल्हा परिषद कार्यालय मात्र या समस्यांकडे दुर्लक्ष करत असल्याने अखेर या महिला सरपंचने जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केलं आहे. सरपंचाने आंदोलनस्थी स्पीकर ठेवून त्यावर 'पैसे घ्या पण कामे करा', असा रेकाँर्डिंग लावली.

Injegaon Sarpanch Muktai Panchalinge protested
Aurangzeb Tomb: औरंगजेबाची कबर केंद्र सरकारने तोडावी; शिवसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे यांनी गजेंद्र शेखावत यांची घेतली भेट, VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com