Nanded Crime : सरकारी नोकरीसाठी बापानं मुलीला विकलं, एक लाखात केला होता सौदा; ८ वर्षांनी धक्कादायक प्रकार समोर

Nanded : नोकरी जाण्याच्या भीतीपोटी एका व्यक्तीने त्याच्या पोटच्या पोरीला एका पुजाऱ्याला विकले. मुलीच्या आईने केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी मुलीचे वडील आणि तिला विकत घेणाऱ्या पुजाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे.
Nanded Crime News
Nanded Crime NewsSaam Tv
Published On

संजय सूर्यवंशी, साम टीव्ही, प्रतिनिधी

पैशांच्या मोहापायी आणि सरकारी नोकरी जाईल या भीतीपोटी एका व्यक्तीने त्याच्या मुलीला विकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी नांदेडच्या भाग्यनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीच्या आईने केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी मुलीच्या वडिलांच्या विरोधात कारवाई केली आहे.

Nanded Crime News
Politics : महिला आमदाराचा तडकाफडकी राजीनामा, राजकारण सोडण्याचा निर्णय

मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीचे वडील हे हिगोंली येथे महसूल विभागाच्या दुय्यम निबंध कार्यालयात अनुकंपावर गेल्यावर शिपाई म्हणून भरती झाले. त्यांना पहिला मुलगा झाला. त्यानंतर दोन जुळ्या मुली झाल्या. जुळ्या मुलींपैकी एक मुलगी एक लाख रुपयांना विकल्याप्रकरणी मुलीच्या आईने भाग्यनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

अल्पवयीन मुलीच्या तक्रारीनंतर तब्बल आठ वर्षांनी मुलीला विकणारे वडील आणि तिला विकत घेणारा पुजारी या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता पोलिसांनी त्या आठ वर्षीय मुलीला पुजाऱ्याकडून ताब्यात घेऊन एका सेवाभावी संस्थेमध्ये ठेवले आहे. मुलीच्या आईने माझी मुलगी मला परत देण्यात यावी अशी मागणी पोलिसांकडे केली आहे.

Nanded Crime News
Wardha : सुरुवात दोघांनी केली, बघता बघता अख्खं शहर एक झालं; आंदोलनाची धग वाढली, कडकडीत बंदपर्यंत पोहचली

अल्पवयीन मुलीचे आरोपी वडील आणि तिची आई मागील आठ वर्षांपासून वेगळे राहत आहेत. गेल्या वर्षी मुलीच्या वडिलांना अनुकंपाखाली शिपाई म्हणून नोकरी लागल्याने हे प्रकरण वर आले आहे. नोकरी जाण्याच्या भीतीने पोटच्या मुलीने विकणाऱ्या वडिलांच्या विरोधात आणि तिला विकत घेणाऱ्या पुजाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लवकरच दोघांवर कारवाई होईल असे म्हटले जात आहे.

Nanded Crime News
Pune Crime : पुणे हादरलं! पाठलाग केला, जबरदस्तीने जंगलात नेलं अन्...; महिलेसोबत नको ते घडलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com