रक्ताचं पाणी करुन रात्रभर झिजला, नराधमाने एका सेकंदात ४५ क्विंटल हरभरा पेटवला; शेतकरी कुटुंबाचा आकांत

Nanded Farmer Gram Crop burnt : या आगीत चार एकरवरील जवळपास ४५ क्विंटल हरभरा जळून खाक झाला आहे. हरभरा जळताना पाहून शेतकऱ्यांच्या कुटूंबीयांनी हंबरडा फोडला. अज्ञात व्यक्तीविरोधात रामतीर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
farmer 45 quintals Gram crop burnt
farmer 45 quintals Gram crop burntSaamTV
Published On

नांदेड : अज्ञात व्यक्तीने लावलेल्या आगीत शेतकऱ्याचा कापून ठेवलेला चार एकरवरील जवळपास अंदाजित ४५ क्विंटल हरभऱ्याचा ढीग जळून खाक झालाय. नांदेडच्या बिलोली तालुक्यातील थडीसावळी या गावातील बालाजी कानगुलवार या शेतकऱ्याचा हा हरभरा होता. सध्या हरभरा काढणीला आला आहे. बालाजी कानगुलवार यांनी आपल्या चार एकर शेतातील हरभरा काढून हरभऱ्याचा ढीग शेतात मारून ठेवला होता.

परंतु अज्ञात व्यक्तीने या हरभऱ्याच्या ढिगाला आग लावली. या आगीत चार एकरवरील जवळपास ४५ क्विंटल हरभरा जळून खाक झाला आहे. हरभरा जळताना पाहून शेतकऱ्यांच्या कुटूंबीयांनी हंबरडा फोडला. अज्ञात व्यक्तीविरोधात रामतीर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत शेतकऱ्याचं जवळपास चार लाखांचं नुकसान झालं आहे.

farmer 45 quintals Gram crop burnt
Nanded Crime : नांदेड हादरले..गुंगीचे औषध देत शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार

भरधाव ट्रक घरात शिरला अन्...

वर्ध्याच्या सिंदी मेघे परिसरात असलेल्या नागठाणा शिवारात महामार्गावर धावणारा ट्रक अचानक अनियंत्रित झाला. ट्रक रस्त्याच्या कडेला बाहेर जात बाजूच्या घरात शिरला. भरधाव असलेल्या ट्रकने अचानक पेट घेतला असून ट्रकला मोठ्या प्रमाणात आग लागली. किराणा माल भरून असलेला हा ट्रक मोठ्या प्रमाणात जळाला आहे. ट्रकमधील चालक व क्लिनर बचावला आहे. हा ट्रक नागपूर येथून कर्नाटक येथील हुबळी येथे माल घेऊन निघाला होता. नागपूर - तुळजापूर मार्गावर ही भीषण घटना घडली आहे.

farmer 45 quintals Gram crop burnt
Nanded Crime : नांदेड शहर गोळीबाराने हादरल, गोळीबारात दोन जण जखमी | Video

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com