Nana Patole: "भाजपच्या पायाखालची जमीन खसकली आहे" नाना पटोलेंचा भाजपवर घणाघात

Nana Patole in Pune: महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता.
Nana Patole's attack on BJP
Nana Patole's attack on BJPsaam tv
Published On

Kasbah Bypoll : पुण्यात आज कसबा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकासआघाडीचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी 'भाजप चौकीदार अदानीचे झालेत की जनतेचे झालेत कळेना' असे म्हणत भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.

महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी अजित पवार, नाना पटोले आणि नीलम गोऱ्हे यांची उपस्थिती होती. सत्यजित तांबेंच्या वादानंतर अजित पवार आणि नाना पटोले पहिल्यांदाच एकाच मंचावर आले.

Nana Patole's attack on BJP
Sharad Pawar News : शरद पवार यांनी सत्ताधाऱ्यांना दिला मोठा इशारा; म्हणाले, 'संधी आल्यावर...'

"भाजपच्या पायाखालची जमीन खसकली"

यावेळी बोलताना नाना पटोले म्हणाले की, देशाचे गृहमंत्री येणार आहेत हे कळले. भाजपच्या पायाखालची जमीन खसकली आहे. पालकमंत्र्यांच्या तोंडावर शाइफेक केली याचे कोणीच समर्थन केले नाही, पण असे का करावे लागले? इंग्रजांची हक्कलपट्टी कसब्यानी केली तशी यांचीही हक्कपट्टी जनता करणार आहे अशा शब्दात पटोले यांनी भाजपवर जोरदार टिकास्त्र सोडले. (Latest Marathi News)

Nana Patole's attack on BJP
Uddhav Thackeray: हिंमत असेल तर निवडणुका घ्या, तयार आहोत; उद्धव ठाकरे यांचे भाजपला आव्हान

"ईडीचं आणि खोक्याचं सरकार"

ईडीचं आणि खोक्याचं सरकार राज्यात आलं. आता एसटी कामगारांची काय अवस्था आहे? लोकशाहीत चाललंय काय? पुण्याचे पालकमंत्री साम दाम दंड भेद वापरा म्हणतात. घमेड उतरवण्याचं काम म्हणजे निवडणूक आहे. निवडणुकीत मतदान करा, नोटा मारू नका असे आवाहन यावेळी पटोलेंनी नागरिकांना केले. (Maharashtra Political News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com