Nana Patole : सत्तेचा फायदा स्वतः साठी करणाऱ्यांची माझ्यावर बोलण्याची पात्रता नाही; नाना पटोलेंचा अशोक चव्हाण यांना इशारा

Nana Patole Criticism on Ashok Chavan : ज्या काँगेसमध्ये ते राहिले त्याच काँगेसमधील लोकांना हरवण्याची व्यवस्था त्यांनी केली होती, असा आरोप नाना पटोले यांनी अशोक चव्हाण यांच्यावर केला आहे.
Nana Patole Car Accident
Nana PatoleSaam tv

संजय सूर्यवंशी, नांदेड

सत्तेचा फायदा स्वतः साठी करणाऱ्या अशोक चव्हाण यांनी माझ्याबद्दल बोलू नये. तेवढी त्यांची पात्रता नाही. ज्या काँगेसमध्ये ते राहिले त्याच काँगेसमधील लोकांना हरवण्याची व्यवस्था त्यांनी केली होती, असा आरोप नाना पटोले यांनी अशोक चव्हाण यांच्यावर केला आहे.

Nana Patole Car Accident
Congress Candidates List: लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची आणखी एक यादी जाहीर, जाणून घ्या कोणाला कुठून मिळाली संधी

नांदेड लोकसभेच्या प्रचारादरम्यान अशोक चव्हाण आणि नाना पटोले यांच्यात आता आरोप प्रत्यारोप सूरु झालेत. मंत्रीपदासाठी नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. त्यांनी राजीनामा दिला नसता तर सरकार टिकलं असतं, असा दावा अशोक चव्हाण यांनी केला होता. त्यावरुन नाना पटोले यांनी अशोक चव्हाण यांना प्रतिउत्तर दिलं आहे.

बांधकाम विभागाचे मंत्री म्हणुन त्यांचाकडे नोटा छापायची मशीन होती. ती बंद पडल्याने त्याचा त्रास अशोक चव्हाण यांना होत आहे, अशा शब्दांत नाना पटोले यांनी टीका केलीये.

अशोक चव्हाण यांनी काँगेस बद्दल काहीच बोलू नये. अन्यथा त्यांनी केलेली सर्व कामे बाहेर काढण्याचे औषध माझ्याकडे आहे. त्यांच्याच पक्षातील आमदार प्रशांत बंब यांनी विधानसभेत अशोक चव्हाण यांची चिठ्ठी वाचून दाखवली होती. त्यापेक्षा जास्त माहिती माझ्याकडे आहे, अशा इशारा नाना पटोलेंनी अशोक चव्हाण यांना दिला आहे.

त्यांनी राज्यात काय काय पाप केले याची मोठी यादी माझ्याकडे आहे. ज्या पक्षात राहतात तिथे खड्डा करतात. भाजपात काय खड्डा केला हे निकालानंतर तुम्हाला पाहायला मिळेल, अशी खरमरीत टीका नाना पटोलेंनी केली आहे.

Nana Patole Car Accident
Pune Crime : खरेदी करण्यासाठी आला अन् सोन्याची चैन घेवून झाला फरार; पुण्याच्या वाघोलीतील घटना

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com