Nana Patole News : कसबामध्ये भाजपचा दावा जनतेने फेल ठरवला; नाना पटोले यांची प्रतिक्रिया

भाजपने पुण्यामध्ये पोटनिवडणुकीसाठी पैशाची लयलूट केली हे सर्व आता जनतेच्या लक्षात आले आहे.
Nana Patole News
Nana Patole NewsSaam Tv

Kasba Peth Bypoll Election Result: भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या कसबा मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा विजय झाला आहे. तब्बल 28 वर्षांनी कसब्यात भाजपचा मोठा पराभव झाला आहे. रवींद्र धंगेकर यांचा 11 हजार 40 मतांनी विजय झाल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे. या ऐतिहासिक विजयानंतर काँग्रेस नेते नाना पटोले यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Nana Patole News
Nashik News : दहावीची परीक्षा द्यायला निघाले अन् वाटेतच होत्याचं नव्हतं झालं! अंगावर काटा आणणार घटनाक्रम

काय म्हणाले नाना पटोले?

कसबा हा मतदारसंग भाजप (BJP) गृहीत घेऊन चालायचा की, आमचा ७/१२ त्याठिकाणी लिहिलेला आहे. पण, भाजपने जी संस्कृती संस्कार सांगून इतकी त्या वर्ष ठिकणी मत घेतली तिथे आज त्यांचा पराभव झाला आहे. आज कस्ब्याच्या जनतेने ज्या प्रकारे भाजपला उत्तर दिल मग महागाई असेल बेरोजगारी असेल छोटा व्यापारी असेल या सगळ्यांनी मिळून भाजपला उत्तर देण्याचा निर्णय घेतला होता. आज भाजपची खरी संस्कृती या निवडणुकीच्या माध्यमातून पुणेकरांनी पहिली असे नाना पटोले (Nana Patole) म्हणाले.

भाजपने पुण्यामध्ये पोटनिवडणुकीसाठी पैशाची लयलूट केली हे सर्व आता जनतेच्या लक्षात आले आहे. कसबामध्ये भाजपचा दावा जनतेने फेल ठरवला आहे. त्यामुळे कसब्यात रवींद्र धनगेकर यांचा विजय झाला आहे. त्यामुळे मी जनतेचे आभार मानतो अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली आहे.

Nana Patole News
Sanjay Raut News : भाजपचा प्रत्येक बालेकिल्ला उध्वस्त करू; कसब्यातील धंगेकरांच्या विजयानंतर संजय राऊत गरजले

विजयानंतर रवींद्र धंगेकर काय म्हणाले?

मी मतदारसंघातील जनतेचे आभार मानतो. त्यांनी माझ्या पारड्यात मतरूपी आशिर्वाद टाकले. त्यांच्या पाठिंब्यामुळेच मी विजयी झालो. त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो, असं धंगेकर म्हणालेत. शिवाय महाविकास आघाडीतील मित्रपक्षांचेही त्यांनी आभार मानलेत. शिवसेना, राष्ट्रवादी आणि अर्थातच काँग्रेसच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी निवडणुकीचं काम केलं. त्यामुळे हा विजयाचा दिवस पाहता आला. त्यांचे मनापासून आभार. या विजयाचं श्रेय जनता आणि महाविकास आघाडीचं आहे, असंही धंगेकर म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com