कोल्हापूर: केंद्राचे धोरण हे आरक्षण विरोधी आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान मोडीत काढण्याचे कारस्थान भाजप करत असल्याची टीका काँग्रेस (Congress) नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी केली आहे. आज कोल्हापुरात उत्तर विधानसभा मतदार संघात प्रचारासाठी काँग्रेसचे नेते आले आहेत. यावेळी काँग्रेसच्या नेत्यांनी महागाई संदर्भात भाजपवर (BJP) टीका केल्या.
कोल्हापुरातील शाहू जन्मस्थळ हे राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित व्हावे ही काँग्रेसची भूमिका आहे. माहागाई विरोधात काँग्रेसने आंदोलन सुरु केले आहे. भाजपने महागाई, बेरोजगारी वाढवली आहे, त्यांच्या विरोधात लोकांमध्ये सध्या चीड आहे. जाणून बुजून महागाई वाढविली जात आहे. देशातील बेरोजगारीही वाढवली जात आहे. कारण त्यांना देशात गोंधळाचे वातावरण निर्माण करुन त्यांचा उद्देश साध्य करायचे असल्याचे नाना पटोले (Nana Patole) म्हणाले.
राज्यातील महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार कसे बदनाम करता येईल एवढंच भाजप पाहत आहे. महाविकास आघाडीतील आमदारांमध्ये विकासाची धुसफूस आहे, ही धुसफूस म्हणजे महाविकास आघाडीतील धुसपूस नाही. बदनाम करुन सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न भाजप (BJP) करत आहे.
Edited By- Santosh Kanmuse
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.