ST Workers Protest : एसटी कर्मचाऱ्यांना चिथावणी देणारे कोण?; नाना पटोले संतापले

या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध करून आंदोलकांना चिथवाणी देणारे कोण आहेत? त्यांचा शोध घेऊन कडक कारवाई करा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.
Nana Patole
Nana PatoleSaam Tv News
Published On

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी काही लोकांनी हल्ला केला, चपला फेकल्या व शरद पवार यांच्या नावाने आक्षेपार्ह भाषेत घोषणा दिल्या. हा प्रकार अत्यंत निषेधार्ह आहे. या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध करून आंदोलकांना चिथवाणी देणारे कोण आहेत? त्यांचा शोध घेऊन कडक कारवाई करा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली.

Nana Patole
Sharad Pawar : शरद पवार यांच्या निवासस्थानाबाहेर एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन

संपकरी एसटी (ST) कर्मचाऱ्यांनी आज, शुक्रवारी शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी घराच्या दिशेने चपला फेकल्या. या आंदोलनामागे काही राजकीय शक्ती असल्याच्या प्रतिक्रिया महाविकास आघाडीच्या नेत्यांनी व्यक्त केल्या. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली. एसटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, ही काँग्रेस (Congress) पक्षाची भूमिका राहिली आहे.

सरकारनेही त्यांच्या मागण्या मान्य केल्या. काल न्यायालयानेही एसटी संपावर निर्णय दिला, तो निर्णयही सर्वांना मान्य आहे; परंतु आज अचानक एक मोठा जमाव शरद पवार यांच्या घरावर चाल करून जातो. हा नियोजित हल्ला दिसत आहे. या आंदोलकांना कोणीतरी पाठवलेले असावे. या आंदोलकांना चिथावणी देणारा कोण आहे? या प्रकारामागे जो कोणी असेल, त्याचा शोध घेऊन कडक कारवाई करावी, अशी मागणी पटोले (Nana Patole) यांनी केली.

आजही आम्ही सर्व जण एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठिशी आहोत. त्यांना न्याय मिळालाच पाहिजे, पण अशा प्रकारे एखाद्या ज्येष्ठ नेत्याच्या घरावर हल्ला करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. काही मतभेद असतील, त्यांच्या काही मागण्या असतील तर, चर्चेतून मार्ग निघू शकतो. अशा पद्धतीने महाराष्ट्राचे वातावरण बिघडवण्याचा जे कोणी प्रयत्न करत आहेत, त्यांना कायद्याच्या चौकटीत जरब बसेल अशी कठोर कारवाई करावी, असेही पटोले (Nana Patole) म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com