नाना पटोलेंचा स्वबळाचा नारा; राष्ट्रवादी- शिवसेनेने दिले प्रत्युत्तर

सर्व पक्षांनी आपली महत्वाकांक्षा बाजूला ठेवून अर्थव्यवस्था व आरोग्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे
नाना पटोलेंचा स्वबळाचा नारा; राष्ट्रवादी- शिवसेनेने दिले प्रत्युत्तर
नाना पटोलेंचा स्वबळाचा नारा; राष्ट्रवादी- शिवसेनेने दिले प्रत्युत्तरSaam Tv
Published On

मुंबई : हायकमांडला मान्य असेल तर मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार व्हायला तयार आहे, अशा शब्दात कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काही दिवसांपूर्वी स्वबळावर लढण्याची घोषणा केली. त्यानंतर राज्याच्या राजकारणात चंगलीच खळबळ माजली आहे. नाना पटोलेंच्या या व्यक्तव्यानंतर शिवसेनेचे पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही त्यांना अप्रत्यक्षपणे सुनावले आहे. ''कोरोना काळात एकहाती सत्ता मिळवण्याचा किंवा स्वबळावर लढण्याचा नारा दिला तर लोक तुम्हाला जोड्याने हाणतील. तसेच, सर्व पक्षांनी आपली महत्वाकांक्षा बाजूला ठेवून अर्थव्यवस्था व आरोग्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. असा सल्लाही त्यांनी दिला आहे. शिवसेनेच्या 55 व्या स्थापना दिनी उद्धव ठाकरे यांनीदेखील आपली भूमिका व्यक्त केली आहे.

दरम्यान, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या या प्रतिक्रियानंतर पुन्हा एकदा नाना पटोलेंनी मुख्यमंत्ऱ्यांच्या प्रतिक्रियेवर भाष्य केल आहे. उद्धव ठाकरे काँग्रेसबद्दल असं बोलल्याचं स्पष्ट झालं तर आम्ही आमच्या पद्धतीने उत्तर देऊ, असे म्हणत त्यांनी शड्डू ठोकले आहेत. भाजप करते त्याप्रमाणे आम्हीपण स्वबळाची भाषा करतो. त्यामुळे मुख्यमंत्री कुणाला बोलले ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. कोरोना महामारीच्या काळात जनतेच्या सेवेत होतो. त्यामुळे आम्हाला जोडे मारण्याचा प्रश्नच नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा कार्यक्रम होता. त्यामुळे ते पक्षप्रमुख म्हणून बोलले असतील. मात्र जर हे काँग्रेसबाबत बोलले असल्याचे स्पष्ट झाले तर आम्ही आमच्या पद्धतीने उत्तर देऊ. एक राजकीय पक्ष म्हणून आम्ही स्वबळावर निवडणूका लढण्याचा निर्णय घेतला तर त्यात गैर काय आहे, असा सवाल त्यांनी विचारला आहे. ”

नाना पटोलेंचा स्वबळाचा नारा; राष्ट्रवादी- शिवसेनेने दिले प्रत्युत्तर
महिलांना अश्लील व्हिडिओ, मेसेज करणारा जीम ट्रेनर पोलिसांच्या जाळ्यात

त्याचबरोबर, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील नाना पाटोले यांच्या स्वबळावर निवडणूक लढविण्याच्या घोषणेवर भूमिका स्पष्ट केली आहे. नाना पटोले यांनी आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली. सरकारमध्ये राहूनच स्वबळावर लढणार असे त्यांनी म्हटले आहे. राहणार पण स्वबळावर लढणार, असं नाना पटोलेंनी सांगितलं आहे. त्यांचंही स्वागत आहे. मग राज्यात राहतात ते दोन पक्ष, एक शिवसेना आणि दूसरा राष्ट्रवादी. हे दोन्ही पक्ष राज्यातील प्रमुख आणि मोठे पक्ष असूनही आम्ही दोघांनीही स्वबळाची भाषा केली नाही. त्यामुळे भविष्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन निवडणूक लढले तर राज्यात चमत्कार होईल, असं राऊत म्हणाले.

तर दुसरीकडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीदेखील कॉंग्रेसला प्रत्युत्तर दिले आहे. ''शिवसेना, राष्ट्रवादीक कॉंग्रेस आणि कॉंग्रेस या तीन पक्षांचे राज्यात युतीचे सरकार आहे. या तीनही पक्षांनी एकत्र राहण्याला प्राधान्य दिलं पाहिजे. मात्र जर काँग्रेसला स्वबळावर लढण्याची इच्छा असेल तर उरकलेले शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस हे दोन पक्ष नक्कीच एकत्र राहतील. महाराष्ट्रातील जनतेचीही तशीच इच्छा दिसत आहे, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. तर, दैनिक सामनाच्या अग्रलेखातूनही यावर भाष्य करणीय आले आहे. ''भाजप आणि काँग्रेससारखे पक्ष स्वबळाच्या दिशेने तयारी करीत आहेत हे चांगलेच झाले. आता महाराष्ट्रात राहता राहिले शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोनच पक्ष, सगळेच स्वबळावर लढत असतील तर या दोन प्रमुख पक्षांना महाराष्ट्र हिताचा विचार करून एकत्र लढावे लागेल', असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com