Nagpur Water Supply: नागपुरकरांनो आजच जास्त पाणी भरून ठेवा; 'या' परिसरांत २ दिवस पाणीपुरवठा खंडित

Water Supply Closed 2 Days: २२ आणि २३ नोव्हेंबर रोजी देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी जळपास आर्ध्या शहराचा पाणीपुरवठा खंडित करण्यात येणार आहे.
Nagpur Water Supply
Nagpur Water SupplySaam Tv

Nagpur News:

नागपुरातील (Nagapur) १८ जलकुंभावरील पाणीपुरवठा सलग दोन दिवस बंद राहणार आहे. २२ आणि २३ नोव्हेंबर रोजी देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी हा बंद असणार आहे. विविध दुरुस्तीच्या कामांमुळे जळपास आर्ध्या शहराचा पाणीपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Nagpur Water Supply
Nagpur News : सरकारच्या 'त्या' निर्णयाच्या निषेर्धात विदर्भातील परमिटरुम, बार आज बंद (पाहा व्हिडिओ)

या दोन दिवसांत जुन्या फीडरवरील सातशे एमएमचा व्हॉल्व आणि पाचशे एमएमपेंच थ्री बायपास व्हॉल्व बदलण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी दोन दिवस पाणी जपून वापरावे असं आवाहन महापालिका आणि पाणी पुरवठा करणाऱ्या ओसीडब्ल्यूकडून करण्यात आलंय.

२२ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून पाणीपुरवठा खंडीत केला जाईल. त्यानंतर २३ नोव्हेंबर रोजी रात्री १० नंतर पाणी पुरवठा सुरळीत होईल. या २ दिवसांच्या कालावधीत लक्ष्मीनगर, धरमपेठ, हनुमाननगर, मंगळवारी आणि गांधीबाग या झोनमधील पाणीपुरवठा खंडित होणार आहे.

लक्ष्मीनगरमधील गायत्रीनगर जलकुंभातील कामगार कॉलनी, आयटी पार्क, गायत्रीनगर, गोपालनगर, विद्या विहार, व्हीआरसी कॅम्पस, पडोळे लेआऊट, गजानननगर, परसोडी, मणी लेआऊट, एसबीआय कॉलनी, विजयनगर येथे पाणीपुरवठा खंडीत राहिल.

जलकुंभमधील खामला जुनी वस्ती, आग्ने लेआऊट, व्यंकटेशनगर, टेलिकॉमनगर, गणेश कॉलनी, मिलिंदनगर, प्रतापनगर, टेलिकॉमनगर, स्वावलंबीनगर, दीनदयालनगर, लोकसेवानगर, पायोनियर सोसायटी, खामला, सिंधी कॉलनी.

लक्ष्मीनगर जलकुंभातील बजाजनगर, लक्ष्मीनगर, रहाटे कॉलनी, अभ्यंकरनगर, अत्रे लेआऊट, पीएनटी कॉलनी, इन्कम टॅक्स कॉलनी, श्रद्धानंदपेठ, माटे चौक, आरपीटीएस कॉलनी, सुर्वेनगर, शहाणे लेआऊट, सुभाषनगर, भेंडे लेआऊट, सोनेगाव, लोकसेवानगर, इंद्रप्रस्थनगर, अमर एमआयजी कॉलनी, एचआयजी कॉलनी, एलआयजी कॉलनी, वसंतनगर, आठरस्ता चौक, प्रतापनगर. टाकळी सीम जलकुंभ: हिंगणा रोड, गुडलक सोसायटी, म्हाडा कॉलनी येथील पाणीपुरवठा खंडित असणार आहे.

मंगळवारी झोनमधील गिट्टीखदान जलकुंभातून पाणीपुरवठा बंद असेल. त्यामुळे शीलानगर, दशरथनगर, मंजीदाना कॉलनी, पटेलनगर, वानखेडे लेआऊट, भूपेशनगर, महेशनगर, गोकुळ सोसायटी, उत्थाननगर, पेन्शननगर, स्वागतनगर, आदर्श कॉलनी, राठोड लेआऊट, अनंतनगर, गांधी लेआऊट, न्यू गांधी लेआऊट, सूरज लेआऊट, मानकापूर, लुंबिनीनगर, ज्ञानेश्वर सोसायटी, ताजनगर, फिरदोस कॉलनी, सादिकाबाद, जयहिंदनगर या परिसरात पाणी बंद असेल.

गांधिबाग झोनमधील बोरियापुरा/ खदान जलकुंभ , किल्ला महाल जलकुंभ, सीताबर्डी किल्ला जलकुंभ येथून पाणीपुरवठा होणाऱ्या परिसरात २ दिवस पाणी येणार नाही.

Nagpur Water Supply
Ajit Pawar : अजित पवारांचं भाषण सुरू असताना कार्यक्रमात गोंधळ, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com