नागपूर : प्रेमाला जात- पात- धर्माच्या मर्यादा नाही, असे म्हटले जातं. मात्र, एकविसाव्या शतकामध्ये प्रेमाचे याही पलीकडले उदाहरण समोर आले आहेत. नागपूरकरांनी (Nagpur) नुकतेच अशाच एका अनोख्या प्रेमबंधाचा (love affair) अनुभव घेतला आहे. जिवापाड प्रेम करणाऱ्या दोन मैत्रिणी (Friend) आयुष्यभरासाठी बंधनामध्ये अडकले आहेत. नागपूरमधील एका छोट्या रिसॉर्टमध्ये छोटेखानी समारंभात त्यांनी साक्षगंध उरकले आहे.
नागपूर येथील डॉ. सुरभी मित्रा आणि कलकत्ता (Kolkata) येथील पारोमिता या उच्चशिक्षित असून त्यांची नागपूर येथील एका परिषदेत भेट झाली. सुरभी डॉक्टर आहे. तर, पारोमिता एका कॉर्पेरिट कंपनीमध्ये (company) असून ती दिल्ली (Delhi) येथे नोकरी करत आहे. प्रथम भेटीमध्ये ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. वर्षभर मैत्री निभावल्यानंतर आपल्यात एक अनोखे नाते असल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आहे.
हे देखील पहा-
प्रेमविवाह म्हटले की अनेक स्तरावर आजही विरोध होतो, अशात लेसबीयन तरुणींच्या या अनोख्या नात्याला विरोध नसता झाला तर नवलच. मात्र, सुरभी आणि पारोमिता या दोघींचे कुटुंबीय समजदार आणि उच्चशिक्षित असल्याने त्यांनी या नात्याचा अखेर स्वीकार केला आहे. दोन्ही कुटुंबीयांनी नागपूरमध्ये साक्षगंध करण्याचा निर्णय घेतला. काही मोजके नातेवाईक, एलजीबीटी (लेस्बियन, गे, बायो, ट्रान्सजेंडर) समूहातील सदस्य अशा दीडशे लोकांच्या उपस्थितीमध्ये हा अनोखा सोहळा पार पडला आहे.
कोरोनाची (Corona) स्थिती वर्षभरात सुस्थितीत आल्यानंतर थाटात लग्नसोहळा (Wedding ceremony) केला जाणार आहे. गेल्या 'काही काळापासून एलजीबीटी समुदायाचे अस्तित्व मोकळ्या मनाने स्वीकारण्याबाबत समाजाचा कल वाढताना दिसत आहे. नागपुरातील मायरा गुप्ता ट्रान्सजेंडर असून, देशातील पहिली ट्रान्सजेंडर नर्स म्हणून ओळखली जाते. तर, भावेश जैन ट्रान्सजेंडर डॉक्टरकीच्या पेशात आहे. नागपुरात झाले साक्षगंध सोहळा या समुदायाने अजून एक मोठे क्रांतिकारी पाऊल टाकल्याची साक्ष देणारा आहे.
Edited By- Digambar Jadhav
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.