Nagpur Train : नागपूरमधून सुटणार २ स्पेशल ट्रेन, कोण कोणते थांबे असणार? वाचा

Special trains for Ashadhi Ekadashi from Nagpur : नागपूर-मिरज यादरम्यान पंढरपूरला आषाढी वारीसाठी चार विशेष गाड्या धावणार. बुकिंग १६ जूनपासून सुरू. ४ जुलैपासून गाड्या उपलब्ध; अनेक महत्त्वाचे थांबे निश्चित.
Nagpur Pandharpur Ashadhi Wari Special Train
Devotees rejoice as Central Railway announces Ashadhi Wari Special Trains from Nagpur to Pandharpur with multiple halts and confirmed schedules from July 4 to July 7.Saam TV News
Published On

Pandharpur Ashadhi Wari Special Train : आषाढी एकादशीला विठूरायाचे दर्शन घेण्यासाठी जाणाऱ्या नागपूरमधील भाविकांसाठी दिलासादायक बातमी आहे. मध्य रेल्वेने पंढरपूरच्या वारीसाठी विशेष रेल्वेगाड्या उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. १ ते १० जुलै यादरम्यान आषाढी वारीसाठी ८० विशेष गाड्या धावणार आहेत. त्यामध्ये नागपूर स्थानकातून पंढरपूरसाठी ४ स्पेशल ट्रेन सुटणार आहेत.

पंढरपूर आषाढी एकादशी वारीसाठी होणारी भाविकांची गर्दी पाहून मध्य रेल्वेने या विशेष गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने नागपूर ते मिरज दरम्यान चार विशेष गाड्या (01205/01206) चालवण्यात येणार आहेत. या विशेष गाड्या "ट्रेन ऑन डिमांड" (TOD) योजनेअंतर्गत चालवल्या जातील आणि त्यांचे भाडे सामान्य भाड्याच्या 1.3 पट जास्त असेल. 01205 नागपूर-मिरज विशेष गाडी ४ आणि ५ जुलै रोजी नागपुरातून सकाळी ८.५० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री ११.५० वाजता मिरजला पोहोचेल. 01206 मिरज-नागपूर विशेष गाडी ६ आणि ७ जुलै रोजी मिरजहून दुपारी १२.२५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे १२.५५ वाजता नागपुरात पोहोचेल.

Nagpur Pandharpur Ashadhi Wari Special Train
Bus Accident : पहाटे काळाचा घाला, शिर्डीकडे जाणाऱ्या बसचा भीषण अपघात, ३ जणांचा मृत्यू, ८ जखमी

कोण कोणते थांबे असतील ?

अजनी, वर्धा, पुलगांव, धामणगाव, चांदुर, बडनेरा, मुर्तिजापुर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड, कुर्डुवाडी, पंढरपूर, सांगोला, म्हसोबा डोंगरगाव,जत रोड, ढालगाव, कवठे महाकाळ, सलगरे आणि अरग

Nagpur Pandharpur Ashadhi Wari Special Train
Encounter : मोठी बातमी! पुण्यातील सराईत गुंडाचा सोलापूरमध्ये मध्यरात्री एन्काऊंटर

स्पेशल ट्रेनची संरचना :

दोन तृतीय वातानुकूलित, १० शयनयान, ४ जनरल सेकंड क्लास आणि २ सेकंड सीटिंग आणि लगेज कम गार्डच्या ब्रेक व्हॅन.

बुकिंग कधीपासून सुरू होईल?

आषाढी विशेष ट्रेन क्रमांक 01205, 01206, 01119, 01120, 01121 आणि 01122 साठी विशेष शुल्कासह बुकिंग दिनांक १६.०६.२०२५ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in संकेतस्थळावर सुरू होईल. अतिजलद मेल/एक्सप्रेस गाड्यांसाठी लागू असलेल्या अनारक्षित निवासस्थानांसाठी सामान्य शुल्क आकारून अनारक्षित कोचची तिकिटे यूटीएस प्रणालीद्वारे बुक करता येतात.

Nagpur Pandharpur Ashadhi Wari Special Train
Vande Bharat : कोल्हापूरकरांना खुशखबर! मुंबईहून धावणार वंदे भारत, वाचा कधीपासून पटरीवर येणार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com