नागपूरातील मोकाट डुक्कर निघाले तामीलनाडूला; पकडली ४०० हून अधिक डुकरे

नागपूरकरांच्या तक्रारी लक्षात घेता मोकाट डुकरे पकडण्याची मोहीम यापुढे देखील सुरू राहणार आहे.
नागपूरातील मोकाट डुक्कर निघाले तामीलनाडूला; पकडली ४०० हून अधिक डुकरे
नागपूरातील मोकाट डुक्कर निघाले तामीलनाडूला; पकडली ४०० हून अधिक डुकरेसंजय डाफ
Published On

नागपूर - १ सप्टेंबरपासून नागपूर Nagpur महापालिकेच्या आरोग्य विभागाने Helth Department मोकाट डुकरे PIg पकडण्याची मोहीम हाती घेतली आहे. तीन दिवसात तमिळनाडूच्या Tamil Nadu पथकाने ४०० हून अधिक डुकरे पकडली असून ही पकडलेली डुकरे आता तामिळनाडूच्या दिशेने रवाना करण्यात आली आहे. नागपूरकरांच्या तक्रारी लक्षात घेता मोकाट डुकरे पकडण्याची मोहीम यापुढे देखील सुरू राहणार आहे.

हे देखील पहा -

पहिल्या दिवशी तामिळनाडूच्या या टीमने नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स कार्यालय परिसरातील नाला, गिट्टीखदाण, आरटीओ नाला, केटीनगर भागातून १८ डुकरे पकडण्यात आली आहे. तर दुसऱ्या दिवशी आरटीओ नाला, बीएसएनएल कार्यालय, महाराजबाग परिसरातून ३२ मोकाट डुकरे पकडण्यात आली आहे. तर तिसऱ्या दिवशी सोनेगाव, मनीषनगर, चिंचभुवन परिसरातून तब्बल ५० डुकरे कडण्यात आली आहे.

नागपूरातील मोकाट डुक्कर निघाले तामीलनाडूला; पकडली ४०० हून अधिक डुकरे
अमरावतीत मुसळधार पाऊस; अप्पर वर्धा धरणाचे १२ दरवाजे उघडले

पकडलेले सर्व डुकरे ट्रकमधून तामिळनाडूच्या दिशेने रवाना करण्यात आली आहे. महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवान आणि पोलिसांच्या उपस्थितीत २५ जाणांच्या पथकातर्फे ही मोहीम राबविली जात आहे. यापूर्वी २०१९ मध्ये जवळपास ५०० हून अधिक डुकरे पकडण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. आता पुन्हा नागपूर महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे ही मोहीम राबविली जात असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाचे नोडल अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले यांनी दिली.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com