Nagpur ST Strike: नागपुरातील संपकरी एसटी कर्मचाऱ्यांची इच्छा मरणाची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र

संपकरी एसटी कर्मचाऱ्यांची विलनिकरणाची मागणी पूर्ण होत नाहीये. अजूनही या प्रश्नावर तोडगा निघालेला नाही.
Nagpur ST Strike
Nagpur ST StrikeSaam TV

Nagpur ST Strike: नागपूर : संपकरी एसटी कर्मचाऱ्यांची विलनिकरणाची मागणी पूर्ण होत नाहीये. अजूनही या प्रश्नावर तोडगा निघालेला नाही. त्यामुळे आमची आर्थिक परिस्थिती बिघडली असून आम्हाला इच्छा मरणाची परवानगी द्यावी, अशी मागणी नागपूरच्या वर्धमान आगारातील एसटी कर्मचाऱ्यांनी केलीये. तसे पत्रच त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहले आहे (Nagpur ST Strike Employees Letter To The Chief Minister To Get Permission For Die Voluntarily).

Nagpur ST Strike
St Strike: एसटी कर्मचाऱ्यांची कामाकडे पाठच; आवाहनानंतरही आंदोलन सुरूच

120 पेक्षा अधिक पत्र या कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना पाठवले आहेत. विलनिकरणाच्या मागणीसाठी 170 पेक्षा अधिक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. यासंदर्भात अनेकदा बैठका झाल्या, मात्र तोडगा निघत नाहीये. त्यामुळे पगार नसल्याने आम्ही आर्थिक अडचणीत सापडलो आहोत. मुख्यमंत्री यावर काहीच बोलत नाहीये. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी यात हस्तक्षेप करावा, भूमिका घ्यावी, नाहीतर आम्हाला इच्छा मरणाची परवानगी द्यावी, अशा आशयाचं पत्र या कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहलंय.

Nagpur ST Strike
ST Strike : महामंडळाने पाठवली कारणे द्या नोटीस; कारवाईच्या भितीने ST चालकाची आत्महत्या

एसटी कर्मचाऱ्यांची कामाकडे पाठच

एसटी महामंडळाच्या राज्य शासनात विलीनीकरणासाठी एसटी कर्मचाऱ्यांचे दोन महिन्‍यांपासून आंदोलन सुरू आहे. यावर तोडगा काढण्यासाठी मुंबईत राष्‍ट्रवादीचे अध्‍यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आवाहन केल्‍यानंतरही कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू होण्याकडे पाठ फिरविली आहे. राज्‍य परिवहन महामंडळाच्‍या कर्मचाऱ्यांच्या (St Strike) आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी सोमवारी (10 जानेवारी) बैठक झाली. त्यात कृती समितीने दिलेल्या निर्णयाचा मध्यवर्ती आगाराशी कुठल्याही प्रकारचा संबंध नसल्याचे अनेक कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. जोपर्यंत एसटी महामंडळाचे (MSRTC) राज्य शासनामध्ये विलीनीकरण होणार नाही, तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही, अशी ठाम भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. त्यामुळे आंदोलक कर्मचारी आपल्या मागणीवर ठाम असल्याचे दिसून येत आहे.

Edited By - Nupur Uppal

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com