जळगाव : एसटी महामंडळाच्या राज्य शासनात विलीनीकरणासाठी एसटी कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. यावर तोडगा काढण्यासाठी मुंबईत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आवाहन केल्यानंतरही कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू होण्याकडे पाठ फिरविली आहे. जळगावात (Jalgaon) मंगळवारी (ता. ११) एकही कर्मचारी रुजू न होता आंदोलनात सहभागी राहिले. (jalgaon news St strike employees back to work The agitation continued even after the appeal)
राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या (St Strike) आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी सोमवारी (ता. १०) बैठक झाली. त्यात कृती समितीने दिलेल्या निर्णयाचा मध्यवर्ती आगाराशी कुठल्याही प्रकारचा संबंध नसल्याचे अनेक कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. जोपर्यंत एसटी महामंडळाचे (MSRTC) राज्य शासनामध्ये विलीनीकरण होणार नाही, तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही, अशी ठाम भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. त्यामुळे आंदोलक कर्मचारी आपल्या मागणीवर ठाम असल्याचे दिसून येत आहे.
आतापर्यंत केवळ वीस कर्मचारी रुजू
मुंबईत (Mumbai) झालेल्या बैठकीत श्री. पवार यांनी आवाहन केल्यानंतर जळगाव विभागातून मंगळवारी एकही कर्मचारी रुजू झालेला नाही. महिनाभरात जळगाव विभागातून आतापर्यंत केवळ २० कर्मचारी रुजू झाले आहेत. यामुळे मोजक्याच आगारांमधून बसफेरी सुरू आहे.
औरंगाबाद, नाशिक, धुळेसाठी फेरी
जळगाव विभागातून जळगाव, अमळनेर, भुसावळ, एरंडोल आगारातूनच बस रवाना होत आहेत. या आगारांमधून ६८ साध्या फेऱ्या, तर १० शिवशाही बसफेऱ्या होत आहेत. यात औरंगाबाद, नाशिक व धुळ्यासाठी दिवसभरातून तीन बस सुटत आहेत. तरीदेखील अपेक्षित फेऱ्या विभागातून होत नसल्याचे चित्र सध्यातरी आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.