Nagpur Riots: नागपूर हिंसाचार प्रकरण; फहीम खाननंतर आता सय्यद असीम अली पोलिसांच्या रडारवर

Nagpur violence: हिंसाचार प्रकरणात मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा सहीम खान याचं नाव समोर आल्यानंतर 2019 मध्ये अटक झालेल्या सय्यद असीम अली याच्यावरही तपास यंत्रणांनी आपली नजर रोखली आहे.
Nagpur Riots
Nagpur violencesaam tv
Published On

पराग ढोबळे, साम प्रतिनिधी

नागपूर हिंसाचार प्रकरणात फहिम खानला अटक झाल्यानंतर आता नवीन एक नाव समोर येत आहे. हिंसाचार प्रकरणात दोषी असलेल्यांना बेड्या ठोकल्या जात आहेत. औरंगजेबच्या कबरीवरून उसळलेल्या दंगलीवरून राजकारण तापलंय. विरोधक सरकारवर टीका करत आहेत. यानंतर गृहमंत्रालय कामाला लागले आहे. हिंसाचार घडवण्यामागे जे जबाबदार आहेत त्यांचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणातील मास्टरमाईंड फहीम खानला पोलिसांनी बुधवारी अटक केली. आता या प्रकरणात सय्यद असीम अली नाव पुढे येत आहे.

कोण आहे सय्यद असीम अली?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सय्यद असीम अली हा मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा पदाधिकारी आहे. त्याला हिंदू नेत्याच्या हत्या प्रकरणाच्या आरोपात अटक झाली होती. तो औरंगजेबाचा कट्टर समर्थक आहे. सय्यद असीम अली हा औरंगजेबाचा खूप गुणगान करत असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. 2015 मध्ये उत्तर प्रदेशातील हिंदू नेते कमलेश तिवारी यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केलं होतं.

Nagpur Riots
Uddhav Thackeray: औरंगजेबच्या थडग्याचा विषय काढणाऱ्यांना थडग्यात गाडलं; उद्धव ठाकरेंचा महायुतीच्या नेत्यांना टोला

या विधानावरून कमलेश तिवारी यांची जो जीभ कापील त्याला बक्षीस देण्यात येईल, याची घोषणा असीम अली यांनी केली होती. यामुळे सय्यद असीम अली चांगलाच चर्चेत आला होता. कमलेश तिवारी यांची हत्या झाल्यानंतर सय्यद असीम अलीला अटक करण्यात आली होती. या प्रकरणात तो 2024 पर्यंत तुरुंगात होता, जुलै 2024 मध्ये सुप्रीम कोर्टाने त्याला जामीन मंजूर झाला होता.

Nagpur Riots
Aurangzeb Tomb: 'औरंगजेबाची कबर, पुढची अयोध्या होणार'; प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक आरोप

कमलेश तिवारी यांची हत्या

2019 मध्ये कमलेश तिवारी यांची लखनौमध्ये हत्या करण्यात आली होती. दरम्यान तिवारी यांचे हत्याकांडातील आरोपींनी सय्यद असीम अली सोबत संपर्क साधून बक्षीसासाठी संपर्क केला होता. याची माहिती वरिष्ठ स्तरावरून मिळताच नागपूर एटीएसने सय्यद असीम अलीला अटक करून उत्तर प्रदेश पोलिसांच्या ताब्यात दिले होते.

दरम्यान नागपूर हिंसाचार प्रकरणात मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचे फहीम खान याचे नाव समोर आल्यानंतर 2019 मध्ये अटक झालेल्या सय्यद असीम अली याच्यावरही तपास यंत्रणांची नजर आहे. पोलिसांनी सय्यद असीम अली याच्या घरी चौकशी केली, मात्र तो घरी नसल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com