Nagpur Riot: नागपूर हिंसाचाराचं राजकीय कनेक्शन; दंगलीमागील मास्टरमाईंडला बेड्या

Nagpur violence Mastermind Arrested: नागपूर हिंसाचारामधील मास्टरमाईंडचा फोटो अखेर समोर आला आहे. गणेशपेठ पोलीस ठाण्यात दंगलखोरांविरुद्ध दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी धडक कारवाई करत त्याला बेड्या ठोकल्या आहेत.
Nagpur Riot: नागपूर हिंसाचाराचं राजकीय कनेक्शन; दंगलीमागील मास्टरमाईंडला बेड्या
Published On

नागपूर दंगल प्रकरणाचा मास्टरमाईंड फहीम शमीम खानला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. न्यायालयाने फहीम खानला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावलीय. बुधवारी सकाळी नागपूर पोलिसांनी दंगलीमागील मास्टरमाईंड फहीम खानला शोधलं होतं. त्यानंतर त्याला बेड्या ठोकल्या.

गणेश पेठ पोलीस स्टेशन ठाण्यात दंगलखोरांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला. त्या एफआयआरमधून दंगलीमागील सुत्रधाराचं नाव समोर आलं होतं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फहीम खान हा राजकीय नेता आहे. तो मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टी (एमडीपी) चा शहराध्यक्ष आहे. हिंसाचार उफाळून येण्यास फहीम शमीम खान जबाबदार आहे. त्यानेच लोकांची माथी भडकवली आणि गर्दी जमवली होती, अशी पोलिसांनी माहिती दिलीय.

Nagpur Riot: नागपूर हिंसाचाराचं राजकीय कनेक्शन; दंगलीमागील मास्टरमाईंडला बेड्या
Nagpur News : नागपुरात दोन गटात दगडफेक अन् जाळपोळ, दंगलीचा A टू Z घटनाक्रम; काय घडलं नागपुरात?

राजकीय नेता निघाला दंगलीचा मास्टरमाईंड

फहीम खान हिंसाचाराच्या काही तास आधी पोलीस स्टेशनमध्ये निवेदन देण्यासाठी गेला होता. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. फहीम खानने मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीच्या तिकिटावर विधानसभेची निवडणूक लढवली होती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधात तो उभा होता.

लोकसभा निवडणुकीत त्याला १०७३ मते पडली होती. निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानंतर फहीम खान राजकीयदृष्ट्या सक्रिय झाला होता. शहरात आपली पकड मजबूत करण्याचा त्याने प्रयत्न केला. दरम्यान फहीम खान हा अनेकदा वादाच्या भोवऱ्यात अडकलाय.

Nagpur Riot: नागपूर हिंसाचाराचं राजकीय कनेक्शन; दंगलीमागील मास्टरमाईंडला बेड्या
Nagpur Clash : संतापजनक! नागपूर राड्यावेळी महिला पोलिसाचा विनयभंग

या ४० ते ५० समर्थकांना केलं होतं एकत्र

पोलीस दिलेल्या माहितीनुसार, या हिंसाचाराचे पूर्वनियोजित कटकारस्थान रचण्यात आले होतं. यात इतर अनेक संशयितांचीही भूमिका असण्याची शक्यता आहे. हिंसाचारानंतरही फहीम खानचे नाव थेट आरोपपत्रात नव्हते. मात्र तपास त्याचा सहभाग स्पष्ट झाला. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने औरंगजेबाच्या कबरीविरोधात आंदोलन केलं होतं. यानंतर फहीम खानने ४० ते ५० समर्थकांना एकत्रित करून गणेशपेठ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. आंदोलनादरम्यान चादर जाळल्याचा आरोप करत कारवाईची मागणी केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com