नागपूर - नागपूरी संत्री ही जगप्रसिद्ध आहे. संत्रा उत्पादक शेतकरी हा सधन शेतकरी म्हणून ओळखला जातो. मात्र, या शेतकऱ्यांवर आता आत्महत्तेची वेळ आली आहे. कारण सध्या बाजारात संत्र्याला कवडीमोल भाव मिळत आहे. चांगल्या प्रतीच्या संत्र्याला दरवर्षी साधारणतः 40 हजारांवर भाव असतो. मात्र, सध्या 3 हजार ते 15 हजार रुपये टन एवढाच भाव शेतकऱ्यांना मिळत आहे. त्यात तोडणी, गाडी भाडे, दलालांचे 8 टक्के असा खर्च वजा करता शेतकऱ्यांच्या हातात काहीही येत नाही.
हे देखील पहा -
आधीच सततच्या पावसामुळे संत्र्याची मोठ्या प्रमाणात गळ झाली आहे, त्यामुळे उत्पादन घटले आहे. अशात कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे दिवाळी कशी साजरी करायची असा प्रश्न पडला आहे. परिणामी सधन समजला संत्रा उत्पादक शेतकरी आता आत्महत्तेची भाषा करू लागला आहे. मायबाप सरकारने आमच्याकडे लक्ष द्यावे, अशी याचना करण्यात येत आहे.
Edited By - Shivani Tichkule
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.