Republic Day: तलावाच्‍या मधोमध पोहत जावून फडकविला तिरंगा अन्‌ पाण्यातच गायले राष्ट्रगीत

तलावाच्‍या मधोमध पोहत जावून फडकविला तिरंगा अन्‌ पाण्यातच गायले राष्ट्रगीत
Republic Day
Republic Daysaam tv

नागपूर : प्रजासत्ताक दिन प्रत्येक जन ओतप्रोत प्रेमाने साजरा करतात. प्रत्येकाची पद्धत वेववेगळी असते. नागपुरातील काही मंडळी दर वर्षी अंबाझरी तलावात पाण्यावर झेंडा फडकवतात आणि राष्ट्रगीत गाऊन प्रजासत्ताक दिन (Republic Day) साजरा केल्या जातो. युवकांमध्ये पोहोण्याप्रती जागरूकता निर्माण करणे आणि देशभक्तीची प्रेरणा देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम केल्या जातो. (nagpur news national anthem was sung while swimming in the middle of the lake)

Republic Day
'काँग्रेस, राष्ट्रवादीने समजूतदारपणा दाखवला असता तर, विश्वजीत कदमांनाचा पराभव झाला नसता'

नागपूरच्या (Nagpur) अंबाझरी तलावात (Ambazari Dam) झेंडा घेऊन पोहत जाणारे हे देश भक्त नागपूरचे आहेत. दरवर्षी २६ जानेवारीला हे या तलावाच्या मधोमध पोहत जाऊन त्या ठिकाणी झेंडा (Indian Flag) फडकावितात आणि पाण्यातच राहून राष्ट्रगीत गातात. याचे देशप्रती प्रेम आणि अनोख झेंडा वंदन बघण्यासाठी या ठिकाणी लोक सुद्धा मोठ्या उत्साहाने येतात.

पाचशे मीटर जातात पोहत

जवळपास ५०० मीटरचे अंतर हे लोक पोहून जातात आणि पाण्यावर उंच ठिकाणी झेंडा फडकवतात. हि परंपरा गेल्या २५ वर्षांपासून सुरु असून दरवर्षी यात नवनवीन लोक जुळतात. ही सर्व मंडळी वर्ष भर या तलावात पोहतात आणि २६ जानेवारी व १५ आगस्टला या ठिकाणी झेंडावंदन करतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com