Nagpur News: कर्ज फेडीसाठी तिजोरीच लांबविली; सीसीटीव्‍हीच्‍या आधारे आरोपी ताब्‍यात

कर्ज फेडीसाठी तिजोरीच लांबविली; सीसीटीव्‍हीच्‍या आधारे आरोपी ताब्‍यात
Nagpur News
Nagpur NewsSaam tv
Published On

नागपूर : नागपूरच्या सक्करदरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत पी. आर. ट्रेडर्सचे कार्यालय फोडून तिजोरी पळवणाऱ्या चार आरोपींना गुन्हे शाखेचा युनिट 4 च्या पथकाने सीसीटीव्हीच्या (CCTV) आधारे अटक केली आहे. (Live Marathi News)

Nagpur News
Bribe Trap: कार्यकारी अभियंत्‍याला रंगेहाथ पकडले; ठेकेदाराकडून मागितली होती 43 लाखाची लाच

अटक केलेल्या ४ आरोपींपैकी २ आरोपींवर कर्ज होते. या कर्जाची परतफेड करण्यासाठी आरोपींनी थेट व्यापाऱ्याची तिजोरीच चोरण्याचा बेत आखला; अशी माहिती खुद्द चोरट्यांनीच पोलिसांनी दिली आहे. चोरीची घटना घडल्यानंतर पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवीत सीसीटीव्ही आणि तांत्रिक पद्धतीने तपास करून आरोपींचा शोध घेतला असता चार आरोपींना अटक केली.

साडेसहा लाखापेक्षा अधिकचा मुद्देमाल जप्‍त

पोलिसांनी ताब्‍यात घेतलेल्‍या ४ चोरट्यांकडून ४ लाख ६० हजाराची रोख रक्कम आणि तीन दुचाकी असा एकूण ६ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास गुन्हे शाखेचे युनिट 4 चे पथक करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com