गुगल पे वरून रिचार्ज पडले महागात; खाते हॅक करत लाखोची रक्‍कम गायब

गुगल पे वरून रिचार्ज पडले महागात; खाते हॅक करत लाखोची रक्‍कम गायब
Cyber Crime News in Marathi, Cyber Fraud News, Nagpur Cyber Crime News
Cyber Crime News in Marathi, Cyber Fraud News, Nagpur Cyber Crime NewsSaam tv
Published On

नागपूर : आजच्‍या ऑनलाईन जमान्‍यात बरेच व्‍यवहार ऑनलाईन केले जातात. हे व्‍यवहार करणे जेवढे सोयीचे आहे. तितकेच ते सांभाळून करणे फायद्याचे ठरते. अन्‍यथा मोठे नुकसान होत असते. असाच प्रकार झाला असून (Cyber Crime) गुगल पे वरून फास्‍ट टॅगचा रिचार्ज करणे चांगलेच महागात पडले आहे. (nagpur news cyber crime recharge from Google Pay Millions lost after hacking accounts)

Cyber Crime News in Marathi, Cyber Fraud News, Nagpur Cyber Crime News
लग्नात नाचताना धक्का लागला म्हणून आदिवासी तरुणाची हत्या

फास्ट टॅगचा (Fastag) रिचार्ज गुगल पे वरून करणे एका महिलेला चांगलेच महागात पडले आहे. रिचार्ज होताच त्या महिलेचे खाते हॅक करून तिच्या खात्यातून लाखो रुपये काढण्यात आल्याची तक्रार नागपूरच्या (Nagpur) सीताबर्डी पोलीस स्टेशन मध्ये दाखल झाली होती. विशेष म्हणजे तक्रारदार महिला या नागपुर सत्र न्यायालयात न्यायाधीश असल्याची माहिती पुढे आली असून या प्रकरणात पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Cyber Crime News in Marathi)

२ लाख ७५ हजार खात्‍यातून ट्रान्‍सफर

सिव्हिल लाईन्स येथील रहिवासी सोनाली मुकुंद कनकदंडे यांनी 14 मे रोजी दुपारी 4 वाजता गुगल पे वरून फास्टॅग कार्ड 500 रुपयांचे रिचार्ज केले. त्यानंतर त्यांनी नेट बँकिंगद्वारे त्यांची काही खाती तपासली. त्यानंतर त्यांना खात्यांमधून व्यवहार झाल्याचे लक्षात आले. अज्ञाताने त्यांच्या विविध खात्यांमधून 2 लाख 75 हजार 399 रुपये इतर खात्यात ट्रान्सफर केले. हे लक्षात येताच त्यांनी संबंधित बँकांच्या कस्टमर केअरला फोन केला. त्यानंतर हे प्रकरण पोलिस ठाण्यात पोहोचले. अद्याप आरोपींबाबत कोणताही ठोस सुगावा लागलेला नाही. सायबर टीमच्या मदतीने या प्रकरणाचा छडा लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com