Nagpur News: रेशनच्‍या चार हजार किलो तांदळाचा काळाबाजार; दोन जणांना पोलिसांनी केली अटक

रेशनच्‍या चार हजार किलो तांदळाचा काळाबाजार; दोन जणांना पोलिसांनी केली अटक
Nagpur News
Nagpur NewsSaam tv
Published On

नागपूर : गरीब माणसाला सरकारकडून स्वस्त दरात मिळणाऱ्या तांदूळाची काळाबाजार करून मार्केटमध्ये आणण्याचा प्रयत्न फसला. नागपूरच्या (Nagpur News) कळमना पोलिसांनी (Police) रेशनच्या चार हजार किलो तांदळाची काळाबाजार करताना दोन आरोपींना अटक केली. एका बोलेरो गाडीमधून याची वाहतूक केली जात होती. (Maharashtra News)

Nagpur News
Pravin Togadia: मस्जिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी आता आंदोलन करावे; प्रवीण तोगडिया यांचा राज ठाकरेंना टोला

कळमना पोलीस स्टेशन हद्दीत चिखली रोडवर एक पिकअप गाडी बंद पडली होती. त्या ठिकाणी गस्तीवर असलेल्या पोलिसांनी त्याची चौकशी केली असता गाडीमध्ये तांदूळ असल्याचे पुढे आले. यावरून पोलिसांनी वाहन चालकाला बिल संबंधित विचारणा केली. मात्र त्याच्याकडे कुठलेही बिल नव्हते आणि हे गोडाऊनमधून भरून मार्केटमध्ये नेत असल्याचा त्यांनी सांगितले.

गोडाऊनवर जाऊन तपासणी

पोलिसांच्या तपासांत हा तांदूळ सरकारी धान्य दुकानातील असल्याचे पुढे आले. पोलिसांनी गोडाऊनवर सुद्धा जाऊन तपासणी केली. मात्र त्या ठिकाणी आणखी धान्य मिळून आले नाही. गरिबांच्या हक्काचे चार हजार किलो तांदूळ बाजारामध्ये विक्रीसाठी जाताना पकडण्यात पोलिसांना यश आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com