Pravin Togadia: मस्जिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी आता आंदोलन करावे; प्रवीण तोगडिया यांचा राज ठाकरेंना टोला

मस्जिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी आता आंदोलन करावे; प्रवीण तोगडिया यांचा राज ठाकरेंना टोला
Pravin Togadia Raj Thackeray
Pravin Togadia Raj ThackeraySaam tv
Published On

जालना : मस्जिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी उद्धव ठाकरे सरकार विरोधात आंदोलन झाले होते. हे आंदोलन करणाऱ्यांनी आताच्या सरकार विरोधात आंदोलन करून मस्जिदीवरील भोंगे उतरवावे; असा टोला प्रवीण तोगडिया (Pravin Togadia) यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांना लगावला आहे. (Tajya Batmya)

आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया हे जालना (Jalna) शहराच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी शहरातील राम मंदिरात आरती केली. यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. राजकारणात आज एकमेकांना विरोध करणारे उद्या एका ताटात जेवतील. त्यांचा विचार आणि चिंता करु नका. स्वस्तात शिक्षण शेतकऱ्यांच्या मालाला भाव कसा मिळेल? यावर चर्चा करा अस सांगत त्यांनी ठाकरे शिंदे आणि भाजपवरील वादावर भाष्य केले.

Pravin Togadia Raj Thackeray
Nagpur News: दोन अल्‍पवयीन मुलींवर अत्‍याचार; नराधम बापास दुहेरी जन्‍मठेप

आदेशाचे पालन व्‍हायला हवे

रात्री दहा वाजेपासून सूर्य उगवेपर्यंत मस्जिदीवर लाऊडस्पीकर वाजायला नको; असे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत. त्याचे पालन व्हायला हवं. आपले काही बंधू उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये मस्जिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी आंदोलन करत होते. आता या सरकारमध्येही त्यांनी आंदोलन करून मस्जिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी आंदोलन करावे; असं प्रवीण तोगडिया यांनी म्हटलं आहे.

तर राम मंदिर सुरक्षित राहणार नाही

माझी लढाई भाजप– शिंदे सरकार विरोधात नाही. माझी लढाई शेतकऱ्यांसाठी आहे; असं सांगत एकनाथ शिंदेंनी कांद्याला चांगला भाव द्यावा. मुख्यमंत्री भाव देणार नाही, तर मग शेतकऱ्यांच्या कांद्याला कोण भाव देईल, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. लोकसंख्या नियंत्रण कायदा नाही बनला तर तयार होत असलेलं राम मंदिर ५० वर्षानंतर देखील सुरक्षित राहणार नाही; असंही तोगडिया यांनी म्हटलंय.

पाकिस्‍तानला कोणतीच मदत करू नये

दरम्यान कंगाल आर्थिक दिवाळखोरीत सापडलेल्या पाकिस्तानवर तात्काळ हल्ला करून अखंड भारत निर्माण करण्याची ही नामी संधी उपलब्ध झाली आहे असे ते म्हणाले. अन्तराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष डाॅ. प्रवीनभाई तोगडिया या वेळी बोटाना म्हणाले आहे पाकिस्तानला भारताने कोणतीच मदत करू नये आणि केन्द्र सरकारने जर काही मदत केली तर आपण त्याला कठोर विरोध करू असे ते म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com