Nagpur Fraud News: धान्य गहाण ठेवून उचलले कर्ज.. नागपूरात १५१ शेतकऱ्यांची तब्बल ११३ कोटींची फसवणूक; मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

Nagpur Fraud With Farmers News: या प्रकरणात १८ पेक्षा जास्त जणांविरुद्ध कट रचून फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Nagpur Fraud With Farmers News
Nagpur Fraud With Farmers NewsSaamtv

Nagpur Fraud: धान्य गहाण ठेवण्याच्या मोबदल्यात शेतकऱ्यांच्या नावाने कर्ज उचलून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार नागपुरमध्ये समोर आला आहे. यामध्ये १५१ शेतकऱ्यांची तब्बल ११३ कोटींची फसवणूक झाली आहे. या प्रकरणात १८ पेक्षा जास्त जणांविरुद्ध कट रचून फसवणुक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

Nagpur Fraud With Farmers News
Nagpur Sana Khan Case: सना खान हत्या प्रकरण, माहिती देणाऱ्याला पोलीस देणार लाखोंचे बक्षीस

काय आहे संपूर्ण प्रकरण?

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नागपूर (Nagpur) जिल्ह्यातील मौदा, पारशिवनी, रामटेक परिसरातील शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. २०१७ मध्ये दुष्काळाचे संकट ओढावल्याने शेतकरी अडचणीत होते. याच परिस्थितीचा फायदा घेत सरकारकडून मदत मिळत असल्याचे सांगत १५१ शेतकऱ्यांचे बॅंक खाते काढले.

त्यावर शेतकऱ्यांच्या खोट्या सह्या घेवून धान्याच्या मोबदल्यात कर्ज मागणीचा अर्ज केला. अर्जानुसार तात्काळ कर्जाला मंजुरी मिळाली. मिळालेल्या धनादेशाद्वारे विविध २४ खात्यांमध्ये कर्जाची रक्कम वळती करून घेत या शेतकऱ्यांची फसवणूक केली.

Nagpur Fraud With Farmers News
Panvel Missing Girl News: २० वर्षीय तरुणीच्या मृत्यूचं गुढ उलगडलं; पोलीस तपासात समोर आली धक्कादायक माहिती

मुख्यमंत्र्यांकडे तक्रार....

दरम्यान, आता बॅंकेकडून या सर्व शेतकऱ्यांना कर्ज फेडीसाठी नोटीस आल्याने हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. यानंतर फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे (Cm EKnath Shinde) तक्रार दाखल केली आहे.

या प्रकरणात मौदा पोलीसांनी १८ पेक्षा जास्त जणांविरुद्ध कट रचून फसवणूक केल्याचा गुन्हा केला दाखल केला आहे. याबाबतचा अधिक तपास नागपूर ग्रामीण पोलीस आर्थिक गुन्हे शाखा करत आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com