Pawankar case: मेहुण्याचं अख्ख कुटूंब संपवणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा, स्वत:च म्हणाला, 'मला त्वरित संपवा'

Nagpur Crime News: नागपूरातील बहुचर्चित पवनकर हत्याकांडातील आरोपी विवेक गुलाबराव पालटकर याला फाशीची शिक्षा
Vivek Gulabrao Palatkar sentenced to death in Pawankar case
Vivek Gulabrao Palatkar sentenced to death in Pawankar casesaam tv
Published On

Nagpur Pawankar case updates: नागपूरातील बहुचर्चित पवनकर हत्याकांडातील आरोपी विवेक गुलाबराव पालटकर याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. पाच वर्षांपूर्वी गुलाबराव पालटकरने बहिण, जावई आणि भाचीसह एका रात्री पाच जणांची हत्या केली होती. १० जून २०१८ रोजी रात्री ९.३० ते १० वाजतादरम्यान हे हत्याकांड घडलं होतं.

या घटनेने संपूर्ण राज्याला हादरवून सोडले होते. या प्रकरणात आता आरोपी असलेल्या विवेक पालटकर याला नागपूर जिल्हा न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान विवेक गुलाबराव पालटकरने न्यायालयापुढे स्वत:चं आयुष्य संपवण्याची मागणी केली होती. ‘मला त्वरित संपवा, मला फाशी द्या, आता मला जगण्याची इच्छा नाही' असे तो न्यायालयासमोर म्हणाला होता.

Vivek Gulabrao Palatkar sentenced to death in Pawankar case
Mumbai-Pune Highway Bus Accident: शॉर्टकटसाठी बस 'नो एन्ट्री'मध्ये शिरली, अन् 13 कुटुंब दु:खात बुडाले; अपघातग्रस्त जागेचा इतिहासही भयानक

नेमकं काय आहे प्रकरण?

विवेक पालटकरने ज्या कुटुंबाची हत्या केली त्यातील मृत कमलाकर पवनकर हा त्याचा मेहुणा होता. विवेक पालटकर पत्नीच्या हत्येच्या प्रकरणात अडकला होता. या प्रकरणात उच्च न्यायालयाने त्याची सुटका केली होती. या प्रकरणात संपूर्ण कायदेशीर प्रक्रियेसाठीचा आर्थिक खर्च पवनकर यांनीच केला होता. (Nagpur News)

परंतु पवनकर आणि विवेक यांच्यात नंतर पैशांवरून वाद झाले. दरम्यान १० जून २०१८ रोजी रात्री ९.३० ते १० वाजण्याच्या सुमारास विवेक हा कमलाकर यांच्या घरी रात्री मुक्कामासाठी आला. रात्री सर्व जण जेवून झोपल्यानंतर विवेकने लोखंडी सब्बलने एकापाठोपाठ एक घरातील पाचही सदस्यांच्या डोक्यावर घाव घालून त्यांची हत्या केली. (Nagpur Crime)

Vivek Gulabrao Palatkar sentenced to death in Pawankar case
Nitish Rana On KKR Loss: घरच्याच मैदानावर पराभव झाल्याने नितीश राणा भडकला! सामन्यानंतर सांगितलं पराभवाचं कारण

मृतांमध्ये कमलाकर मोतीराम पवनकर (वय ४८), त्यांच्या पत्नी अर्चना (वय ४५), आई मीराबाई (वय ७३), मुलगी वेदांती कमलाकर पवनकर (वय १२) आणि भाचा कृष्णा ऊर्फ गणेश विवेक पालटकर (वय ५) यांचा समावेश होता. या घटनेनंतर पोलिसांनी विवेकला अटक केली होती. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com