सावधान! सोशल मीडियाचा वापर करताय?; मग ही बातमी वाचाच...

नागपूर शहरात सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अनेकांना अडकवण्यात आलंय.
Social Media Nagpur Crime
Social Media Nagpur CrimeSaam TV
Published On

नागपूर : तुम्ही जर सोशल मीडियावर (Social Media) सक्रिय असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. कारण, सोशल मीडियावर सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकवणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. नागपूर शहरात सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अनेकांना अडकवण्यात आलंय. यात विशेषतः उच्चशिक्षित टार्गेटवर आहे. त्यामुळे नागपूर पोलिसांनी (Police) सोशल मिडियावर अलर्ट जारी केलाय. (Nagpur News Today)

Social Media Nagpur Crime
Mumbai Goa Expressway : कशेडी घाटात भीषण अपघात; तब्बल १५० फूट खोल दरीत कोसळला ट्रक

“अनोळखी व्यक्तींशी सोशल मिडियावर संवाद साधू नये, सेक्सटॅार्शनच्या जाळ्यात अडकल्यास लगेच पोलीस तक्रार करावी आणि सावधगिरीने बाळगावी” असं आवाहन नागपूर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केलंय. त्यामुळे तुम्हाला जर सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तीचा कॉल किंवा मॅसेज आला तर त्याला मुळीच प्रतिसाद देऊ नका.

देशाच्या वेगवेगळ्या भागात बसून या टोळ्या नागपूरात आपलं सावज शोधतात. सेक्सटॅार्शनच्या जाळ्यात अडकवून नुकतंच नागपूरातील एका डॉक्टरची एक मुलीने १६ लाख रुपयांची फसवणूक केली. सायबर गुन्हेगारांच्या अनेक टोळ्या सध्या सक्रिय आहे. (Nagpur Latest Marathi News)

Social Media Nagpur Crime
Bullock Cart Race Ban : आयाेजकांनाे ! बैलगाडा शर्यतींवर आली बंदी; जाणून घ्या कारण

या टोळ्यांकडून सोशल मीडियावर ओळख, नंतर चॅटिंग, अश्लिल व्हिडीओ कॉल, त्यानंतर खंडणी मागणीतली जाते. बदनामीच्या भितीनं अनेक लोक पोलीस तक्रार करत नाही. मात्र, सेक्सटॉर्शनच्या गुन्ह्याचे प्रकार वाढल्याचे नागपूर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सुद्धा मान्य केलं आहे. तसेच नागरिकांनी सावध राहावे असे आवाहनही त्यांनी केलंय.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com