Nagpur: शेंगदाण्याची पिस्ता म्‍हणून विक्री; १२ लाखाचा बनावट पिस्‍ता जप्‍त

शेंगदाण्याची पिस्ता म्‍हणून विक्री; १२ लाखाचा बनावट पिस्‍ता जप्‍त
Nagpur Crime News
Nagpur Crime NewsSaam tv

नागपूर : नागपूर पोलीस आणि अन्न व औषधी प्रशासन विभागाने मोठी कारवाई करत बनावट पिस्ता बनविणाऱ्या कंपनीवर (Nagpur Crime) धाड टाकली. यात 12 लाख रुपये किंमतीचा बनावट पिस्ता आणि इतर साहित्य जप्त केले आहे. तर दोन आरोपींना सुद्धा अटक करण्यात आली. (Live Marathi News)

Nagpur Crime News
Nashik News: हप्‍ता थकल्‍याने जप्‍त केली गाडी; एजंटने डिक्‍की उघडली असता आढळला गावठी कट्टा

नागपूर पोलिसांनी (Nagpur Police) एका व्यक्तीला दुचाकी वाहनावर संशयित रित्या सामान घेऊन जाताना बघितले. त्याची चौकशी केली असता त्याच्याजवळ काही बॅगमध्ये शेंगदाण्याप्रमाणे दिसणाऱ्या पण पिस्ता आढळून आला. मात्र तो पिस्ता रंग लावलेला आणि कटिंग करून बनविलेला होता. पोलिसांनी (Police) त्याला कुठून आणल्याचा विचारले; तेव्हा त्याने गोळीबार चौकातील एका कंपनीतून हा आणला असून याची मोठ्या प्रमाणात विक्री मिठाई बनवणाऱ्या कंपन्यांसाठी होते असल्याचे सांगितले.

शेंगदाणा पिस्ता बनवून विक्री

पोलिसांनी सापळा रचत बनावट पिस्ता बनवणाऱ्या कंपनीवर (Crime News) धाड टाकली. त्या ठिकाणी बघितले तर शेंगदाणे भिजवून त्याला वाळविला जात होता. वाळलेल्या शेंगदाण्यांना घातक रंग लावून मग मशीनच्या साह्याने पिस्ताप्रमाणे त्याची कटिंग केली जायची. 70 रुपये किलोच्या भावाने मिळणारा शेंगदाणा हे लोक त्याला पिस्ता बनवून 1100 रुपये किलोच्या भावाने विकायचे. पोलिसांनी या ठिकाणी सगळा माल जप्त केला अन्न व प्रशासन विभागाला याची माहिती दिली ते अधिकारी सुद्धा त्या ठिकाणी दाखल झाले. हा संपूर्ण पिस्ता बघितल्यानंतर त्यांनीही आश्चर्य व्यक्त केले.

१२ लाखाचा पिस्‍ता जप्‍त

पोलीस आणि अन्न प्रशासन विभागाने केलेल्या या कारवाईमध्ये जवळपास 12 लाख रुपये किंमतीचा पिस्ता आणि ते बनविण्यासाठी लागणाऱ्या मशीन जप्त करण्यात आल्या. सोबतच दोन आरोपींना सुद्धा पोलिसांनी अटक केली. पैसे कमवण्यासाठी नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रयत्न या लोकांनी केला. बोगस पिस्ता बनवून तो मार्केटमध्ये विकण्याचा गोरख धंदा गेल्या अनेक वर्षापासून सुरू असल्याचा सुद्धा समोर आला. मात्र आता पोलिसांनी यांना बेड्या ठोकल्या. पण खऱ्या अर्थाने अशा प्रकारे भेसळ करणाऱ्याची पाळमूळ शोधून काढण्याची आवश्यकता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com