Nashik News: हप्‍ता थकल्‍याने जप्‍त केली गाडी; एजंटने डिक्‍की उघडली असता आढळला गावठी कट्टा

हप्‍ता थकल्‍याने जप्‍त केली गाडी; एजंटने डिक्‍की उघडली असता आढळला गावठी कट्टा
Nashik News
Nashik NewsSaam tv

तरबेज शेख

नाशिक : वाहन कर्जाचा हप्ता घेण्यासाठी गेलेल्या खासगी फायनान्स कंपनीच्या वसुली एजंटने महिलेची गाडी जमा केली. जप्‍त (Nashik) केलेली मोपेडची डिक्की उघडून पाहिली असता त्यात जुनाट झालेला गावठी कट्टा आढळून आला. याबाबत कर्जदार महिलेविरुद्ध कट्टा बाळगल्याचा गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे. (Tajya Batmya)

Nashik News
Dhule: भारत जोडो यात्रेसाठी धुळ्यातून हजारो कार्यकर्ते रवाना

फायनान्स कंपनीचे (finance Company) कर्मचारी नरेंद्र गौतम शिलेदार यांच्या फिर्यादीनुसार रिया पटवर्धन यांनी मोपेडसाठी वाहन कर्ज घेतले होते. मात्र त्यांच्याकडे वाहनाच्या कर्जाचे हप्ते थकले होते. त्यामुळे शिलेदार हे रविवारी दुपारी तीन वाजता रिया यांच्या घरी थकीत हप्त्यापोटी वाहन जप्त करण्यासाठी गेले होते. त्यावेळी रिया यांनी मोपेड जप्त करून घेऊन जाण्यास सांगितले.

महिलेने पाठविला व्‍हॉटस्‌ॲप मॅसेज

तत्पूर्वी रिया यांनी शिलेदार यांचे वरिष्ठ योगेश कटारे यांना व्हॉटसॲपवर मेसेज पाठविला होता. तो त्यांना वाचण्यास सांगा असे सांगितले. शिलेदार यांनी मोपेड घेऊन कंपनी कार्यालयाच्या दिशेने निघाले असता त्यांना वाटेतच कटारे यांचा फोन आला आणि मोपेडची डिक्की उघडण्यास सांगितले. शिलेदार यांनी डिक्की उघडली असता त्यात गावठी कट्टा होता. कटारे यांच्या सूचनेनुसार, शिलेदार हे मोपेड घेऊन पुन्हा रिया यांच्या इमारतीच्या पार्किंगमध्ये पोहोचले.

तरुणीविरोधात पोलिसात गुन्‍हा

घटनेची माहिती भद्रकाली पोलिसांना दिली. पोलीसही घटनास्थळी पोहोचले. पंचनामा करुन कट्टा जप्त करीत पोलिसांनी रिया पटवर्धन या तरुणीविरोधात भद्रकाली पोलिसांत हत्यार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. संशयित रिया ही तिच्या आत्याच्या घरात राहते. घराची साफसफाई करीत असताना तिच्या हाती हा जुना गावठी कट्टा हाती लागला. गंजलेल्या अवस्थेतील हा कट्टा असला तरी तो बाळगणे गुन्हा असल्याने संशयित युवतीविरोधात गुन्हा नोंदविला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com