Nagpur Crime : मोठी बातमी! नागपूर होतंय अंमली पदार्थ तस्करांचं हब; कोटींचा साठा जप्त

1 कोटी 91 लाख 10 हजार रुपयांचे अंमली पदार्थ (एमडी)जप्त केले आहेत.
Nagpur Crime
Nagpur Crime Saam Tv

Narcotics Seized : नागपूर येथून एक मोठी बातमी समोर आली आहे. नागपुरात अंमली पदार्थ तस्करी विरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. यामध्ये सुमारे 1 किलो 911 ग्राम मेफेड्रोन (एमडी) जप्त करण्यात आला आहे. तसेच अंदाजे 1 कोटी 91 लाख 10 हजार रुपयांचे अंमली पदार्थ (एमडी)जप्त केले आहेत. (Latest crime News)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली आहे. कुणाल गबणे आणि गौरव कालेश्वरवार या दोन तरुणांच्या ताब्यातून अंमली पदार्थ जप्त केले आहेत. नागपूर पोलिसांनी या दोघांनाही ताब्यात घेतलं असून त्यांच्यावर कारवाई सुरू आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाची आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई आहे.

Nagpur Crime
Dhule Crime News: धुळ्यात अंमली पदार्थांचा मोठा साठा जप्त; सोनगीर पोलिसांची धडक कारवाई

सध्या सर्वत्र होळी सणाची धामधूम सुरू आहे. होळी खेळण्यासाठी अनेक जण रंगांची जमवाजमव करत आहेत. तर काही जण होळीच्या निमित्ताने अंमली पदार्थ खरेदी करणार होते. होळी निमित्त नागपूरसह मुंबईत देखील अंमली पदार्थ विक्रेत्यांचा सुळसूळाट सुटलेला दिसत आहे.काल मुंबईतून ५५ ग्रॅम अंमली पदार्थ जप्त करण्यात आलेत.

Nagpur Crime
Shraddha News Update: श्रद्धा वालकर हत्या प्रकरणी नवीन अँगल; अंमली तस्कर पोलिसांच्या ताब्यात

मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने सहारगाव, अंधेरी पूर्व भागातून 2 आफ्रिकन तरुणांना अटक करुन ५५ ग्रॅम अंमली पदार्थ जप्त केला. याची अंदाजे किंमत ११ लाख इतकी सांगितली जात आहे. अटक करण्यात आलेले हे दोन्हीही तरुण आफ्रिकन असून त्या दोघांचे वय 23 वर्ष आहे.

शहरामधील शाळा, महाविदयालयीन परिसराजवळ अंमली पदार्थ विकणाऱ्या पेडलर व विक्रेत्यांविरोधात कारवाई करण्याबाबत वरिष्ठांनी आदेश दिले होते. त्यानुसार 1 फेब्रुवारीला गस्त करत दोन अफ्रिकन वंशाचे तरुणांना अंधेरी परिसरातून अटक करण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com