

Nagpur: नागपुर शहरातील वाढती गुन्हेगारी सध्या चिंतेचा विषय ठरत आहे. शहरामध्ये वारंवार हत्येच्या घटना समोर येत असतानाच नागपूरच्या तहसील पोलीस स्टेशनच्या हद्दीत अग्रेसन चौक परिसरात धारदार शस्त्राने वार करत इसमाची हत्या केल्याची घटना घडली आहे.
यामध्ये परवेज शेख असे मृत तरुणाचे नाव असून पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत. (Nagpur)
याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, या हत्येतील प्रमुख आरोपी आणि हत्या झालेला तरुण आधीपासूनच एकमेकांना ओळखत होते. तसेच ते प्रॉपर्टीच्या व्यवसायात सोबत काम करत होते. दोघांमध्ये जुन्या पैश्याचा वाद सुरू होता.
याच वादातून आरोपीने रात्रीच्या सुमारास परवेज शेख याला तुला पैसे देतो म्हणून अग्रेशन चौक येथे बोलवले. यानंतर आरोपीने आणि इतर साथीदारांनी मिळून त्याला चाकूने वार करत त्याची हत्या करण्यात आली.
या घटनेनंतर आरोपी फरार झाले असून पोलीस पुढील तपास करत आहेत. दरम्यान, क्षुल्लक कारणावरून ही हत्या झाली असून सोबतच्याच व्यक्तीने ही हत्या घडविली असल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. (Crime News)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.