नागपूर: नागपुरात ग्रामीण भागातील शाळा सुरु करण्याबाबत प्रशासन सकारात्मक आहे, असे संकेत नागपूर जिल्हाधिकारी आर. विमला यांनी दिले आहेत. आजच्या बैठकीत आढावा घेऊन शाळा सुरु करण्याबाबत निर्णय घेऊ, असं नागपूरच्या जिल्हाधिकारी आर. विमला यांनी सांगितलंय (Nagpur Collector says administration positive about school reopening in rural Nagpur).
सोमवारी 24 तारखेपासून शाळा (School) सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय. शाळा सुरु करण्याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलाय. त्यानुसार, नागपूर (Nagpur) च्या जिल्हाधिकारी आर. विमला यांनी शाळा सुरु करण्याचे संकेत दिले आहेत. ‘ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना ॲानलाईन शिक्षणाची (Online Education) फारशी चांगली सुनिधा नाही, त्यामुळे त्यांचं नुकसान होतंय', असंही त्या म्हणाल्या.
शिवाय, शाळा बंद असल्याने ही मुलं बाहेर फिरतात. त्यामुळे शाळा सुरु केल्यास मुलांचं नुकसान होणार नाही, असंही नागपूर जिल्हाधिकारी आर. विमला यांनी सांगितले.
Edited By - Nupur Uppal
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.