Schools : मुंबईत २४ जानेवारीपासून शाळा सुरु; महापालिकेचे परिपत्रक जारी

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यस्थापनांच्या पूर्व प्राथमिक ते इयत्ता 12 वी पर्यंतच्या शाळा 24 जानेवारी पासून प्रत्यक्ष अध्ययन/अध्यापन सुरु करण्यासाठी आयुक्तांची मंजुरी.
Schools : मुंबईत २४ जानेवारीपासून शाळा सुरु; महापालिकेचे परिपत्रक जारी
Schools : मुंबईत २४ जानेवारीपासून शाळा सुरु; महापालिकेचे परिपत्रक जारीSaam Tv
Published On

मुंबई : कोरोनाचा प्रसार वाढत असल्याने मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यस्थापनाच्या शाळा 31 जानेवारी 2022 पर्यंत बंद ठेवण्याबाबत निर्देश देण्यात आले होते. परंतु, सद्यस्थितीत मुंबई महानगरपालिका क्षेत्रात कोव्हिड-19 च्या प्रसाराचे कमी होणारे प्रमाण लक्षात घेता यापूर्वी जारी करण्यात आलेल्या कोव्हीड-19 बबाबत महाराष्ट्र शासनाच्या संदर्भाधीन बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यस्थापनांच्या पूर्व प्राथमिक ते इयत्ता 12 वी पर्यंतच्या शाळा दि. 24 जानेवारी, 2022 पासून प्रत्यक्ष अध्ययन/अध्यापन सुरु करण्यासाठी आयुक्तांची मंजुरी दिलेली आहे.

हे देखील पहा :

शाळा सुरू करण्या बाबत मार्गदर्शक सूचना

1. कोव्हीड-19 बाबत महाराष्ट्र शासनाच्या संदर्भाधीन दि. 15 जून, 2020. दि. 29 ऑक्टोबर 2020 दि. 10 नोव्हेंबर 2020, दि. 10 ऑगस्ट 2021, दि. 24 सप्टेंबर 2021 दि. 29 नोव्हेंबर 2021 व दिनांक 20 जानेवारी 2022 रोजीच्या परिपत्रकातील मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करून बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या व नगरबाह्य विभागाच्या पूर्व प्राथमिक ते इयत्ता 12 वी पर्यंतच्या शाळा दि. 24 जानेवारी 2022 पासून प्रत्यक्ष अध्ययन / अध्यापनासाठी सुरु कराव्यात.

2. विद्यार्थ्याच्या पालकांकडून शाळेत पाठविण्याबाबतचे संमतीपत्र प्राप्त करून घेण्यात यावेत, ज्या विद्यार्थ्याच्या पालकांकडून संमतीपत्र प्राप्त झाले नाहीत त्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन अध्ययन / अध्यापनाचे कार्य सुरु ठेवावे.

3. सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचा-यांनी अध्ययन व अध्यापनासाठी शाळेमध्ये प्रत्यक्ष उपस्थित रहावे. 4. शाळा सुरु करण्याच्या पूर्वतयारीकरिता संबंधित शिक्षक शिक्षकेतर कर्मचा-यांना कोविडच्या नियमांचे पालन करून आवश्यकतेनुसार शाळेत प्रत्यक्ष उपस्थित ठेवण्याबाबतची कार्यवाही मुख्याध्यापक स्तरावर करावी,

5. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील मनपा शाळांचे संबंधीत सहाय्यक आयुक्त यांच्या सहाय्याने निर्जतुकीकरण करुन घ्यावे व कोव्हीड मेंटर, विलगीकरण कक्ष व लसीकरण केंद्र अन्य ठिकाणी स्थलांतरीत करुन घ्यावे. इतर व्यवस्थापनाच्या ळांनी आपल्या स्तरावर शाळांचे निर्जनुकीकरण करून घ्यावे.

6. कोव्हीड मेंटर, रेल्वे स्टेशनवर कोव्हीड नमीकरण प्रमाणपत्र पडताळणी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या शिक्षक कर्मचा-यांच्या नेमणूका संबंधितांकडून रद्द करून घ्याव्यात.

7. बृहन्मुंबई क्षेत्रातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या पूर्व प्राथमिक ते इयत्ता 12 वी पर्यंतच्या शाळा महानगरपालिकेच्या किंवा खाजगी आरोग्य केंद्राशी संलग्न कराव्यात.

8. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शाळेतील विद्यार्थ्याचे नियोजनानुसार लसीकरण केंद्रावर लसीकरण करून घ्यावे. सर्व शाळांनी उपरोक्त मुद्दा क्र. 1 ते 8 येथील सुचनानुसार कार्यवाही करावी व त्याचे काटेकोरपणे पालन होईल याची दक्षता घ्यावी.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com