Nagpur: सुशिक्षित दाम्पत्याचा एकमेकांवर भरोसा नाही, दीड वर्षात कौटुंबिक वादाची 2 हजार 50 प्रकरणं

सुक्षक्षितांचा एकमेकांवर ‘भरोसा’ नसल्याची बाब समोर आली आहे.
couple
couple Saam Tv
Published On

नागपूर: शिक्षणातून समजूतदारपणा येतो असं म्हणतात, असं असलं तरी नागपूर शहरातील ‘भरोसा सेल’कडे गेल्या पंधरा महिन्यात 2 हजार 526 आलेल्या कौटुंबिक वादाच्या तक्रारींमध्ये सर्वाधिक 85 टक्के प्रकरणं ही सुशिक्षित दाम्पत्यांनी दाखल केली आहेत. त्यामुळे सुक्षक्षितांचा एकमेकांवर ‘भरोसा’ नसल्याची बाब समोर आली आहे.

couple
Video : "सुंदर न दिसणाऱ्या मुलींचीही लग्न होतात", महाविद्यालयात सांगितलं जातंय हुंड्याचं महत्त्व

शिक्षणातून व्यक्ती ज्ञानी होतो, त्याची समाजाकडे बघण्याची दृष्टी बदलते, सामाजिक जाणीव निर्माण होत असल्याचे सांगण्यात येते. मात्र, याच शिक्षणातून पती-पत्नींच्या नात्यामध्ये दुरावाही तितकाच निर्माण होत असल्याची बाब सातत्याने समोर येत आहे. त्याची परिणिती भांडणात होऊन अगदी एकमेकांपासून काडीमोड करण्यापर्यंत जाते.

या प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी शहर पोलिसांच्या (Police) माध्यमातून ‘भरोसा सेल’ (Bharosa Cell) चालविण्यात येते. दाम्पत्यांचे (Couple) समुपदेशन, कायदेशीर सल्ला आणि त्यांच्या नात्यातील दुरावा कमी करीत, त्यांचा ‘समेट’ घडवून आणण्याचे काम या सेलच्या माध्यमातून केले जाते. गेल्या वर्षी सेलकडे 2 हजार 50 प्रकरणे नोंदविण्यात आली आहेत.

सुशिक्षित दाम्पत्यामध्ये वाद होण्याची कारणे:

- अधिकाराची जाणीव असणे

- स्वतःच्या पायावर उभे राहण्याची क्षमता

- सासू-सासरे, आई-वडिलांची भूमिका

- लग्नानंतर वागणुकीत होणारे बदल

भरोसा सेलमार्फत समुपदेशन करताना सुशिक्षित दाम्पत्यांचा आडमुठेपणा बऱ्याच प्रमाणात आडवा येतो. त्यामुळे बरीच प्रकरणे ही काडीमोडपर्यंत जाताना दिसून येतात. याउलट अशिक्षितांमध्ये त्याचे प्रमाण केवळ 15 टक्के असून त्यातही समेट होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com