भरत मोहळकर, साम प्रतिनिधी
नागपूरमधल्या अपघाताला आता नवं वळण लागलंय. या वादात आता बिफची एण्ट्री झालीय. अपघात घडण्यापूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा मुलगा संकेत बावनकुळेने नागपूरमधील लाहोरी बारमध्ये बीफ कटलेट खाल्ल्याचा खळबळजनक दावाच संजय राऊतांनी केलाय...गणेशोत्सवात बीफ खायचे आणि रस्त्यावर लोकांचे जीव घ्यायचे, असं सुरु असल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय. तर संजय राऊतांचं मानसिक संतुलन बिघ़डल्याचा टोला शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाटांनी लगावलाय.
संकेत बावनकुळे हे नागपूरच्या ज्या हॉलेटमध्ये होते त्या लाहोरी बारच्या मेन्यूकार्डमध्ये बीफ नसल्याचा दावा हॉटेलनं केलाय. रविवारी मध्यरात्री नागपूरच्या सीताबर्डी भागात भरधाव ऑडीने काही वाहनांना धडक दिली. यातील ऑडी ही भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा मुलगा संकेत बावनकुळेची असल्याचं समोर आलं. त्यावरून राजकारण तापलंय. त्यातच आता संकेत बावनकुळे बीफ खाऊन आणि दारु पिऊन गाडी चालवत असल्याचा आरोप राऊतांनी केल्यामुळे आता अपघातासोबत हॉटेलच्या मेन्यूवरूनही वाद रंगलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.