Shocking : आत्याच्या घरी सुरु होती लगीन घाई, कुटुंबीयांची नजर चुकवून १३ वर्षीय मुलीने केली आत्महत्या, धक्कादायक कारण आलं समोर

Nagpur News : नागपूरमध्ये मोबाईल वापराला नकार दिल्यानंतर १३ वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांकडून तपास सुरू असून या घटनेने पालकत्व आणि मोबाईल व्यसनावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
Shocking : आत्याच्या घरी सुरु होती लगीन घाई, कुटुंबीयांची नजर चुकवून १३ वर्षीय मुलीने केली आत्महत्या, धक्कादायक कारण आलं समोर
Nagpur NewsSaam Tv
Published On
Summary
  • १३ वर्षीय विद्यार्थिनीने मोबाईल न दिल्याने आत्महत्या केली

  • नागपूरच्या खापरखेडा परिसरातील घटना

  • कुटुंबीय लग्नसराईत असताना मुलीने घेतला टोकाचा निर्णय

  • मोबाईल व्यसनावर गंभीर प्रश्न उपस्थित

नागपूरमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका १३ वर्षीय विद्यार्थिनीने कुटुंबीयांनी फोन वापरायला नकार दिल्याने आयुष्याचा दोर कापला. सदर घटना काल संध्याकाळी घडली असून या घटनेनंतर पोलिसांनी मृत मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. मृत मुलीचे नाव दिव्या सुरेश कोठारे (Divya Suresh Kothare) असे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिव्या इयत्ता ८ वीत शिकत होती. गेले बरेच दिवस दिव्या मोबाईलचा अतिवापर करत होती. शिवाय अभ्यासाचा कंटाळा देखील करत होती. ही गोष्ट तिच्या पालकांच्या निदर्शनास आली. त्यामुळे दिव्याच्या पालकांनी जमेल तेवढं तिला मोबाईलपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला. शिवाय मोबाईल कमी करून अभ्यास कर असा सल्ला देखील दिला.

Shocking : आत्याच्या घरी सुरु होती लगीन घाई, कुटुंबीयांची नजर चुकवून १३ वर्षीय मुलीने केली आत्महत्या, धक्कादायक कारण आलं समोर
Maharashtra Politics : घराणेशाहीला ब्रेक! अहिल्यानगरच्या राजकारणात नव्या समीकरणांची सुरुवात, भाजपाचा धडाकेबाज निर्णय

गेल्या बऱ्याच दिवसापासून हे सुरु होत. मात्र शुक्रवारी दिव्याच्या आत्याच्या लग्नासाठी कोठारे कुटुंबीय लग्नसराईत व्यस्त होते. सायंकाळी नेहमीप्रमाणे दिव्याने कटुंबीयांकडे मोबाईल मागितला, मात्र घरच्यांनी नकार दिला. मोबाईल न दिल्याने दिव्या रागावली. संतापाच्या भरात ती आत्याच्या घरातून निघून सरळ स्वतःच्या घरी आली.

Shocking : आत्याच्या घरी सुरु होती लगीन घाई, कुटुंबीयांची नजर चुकवून १३ वर्षीय मुलीने केली आत्महत्या, धक्कादायक कारण आलं समोर
Pune Police : पुण्याच्या १०५ पोलिसांचे मध्य प्रदेशात स्पेशल ऑपरेशन, पण खर्च केला कुणी? अधिकार्‍यांचे मौन

घरी कोणी नसल्याची संधी साधून घरात बांधलेल्या पाळण्याच्या दोरीला तिने गळफास घेतला. काही वेळाने तिची मोठी बहीण तिला शोधत घरी आली असता हा प्रकार उघडकीस आला. कुटुंबियांना घटनेचा प्रकार समजताच दिव्याच्या पालकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच खापरखेडा पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला असून पुढील तापस सुरू आहे. मात्र या घटनेने सर्व पालकांना हादरून सोडले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com