ही जाहिरात आहे.. धर्मांवर आधारित उभ्या राहणाऱ्या एक टाउनशिपची... मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या कर्जतमधील एका टाउनशिपनं हलाल लाईफस्टाईलशी संबंधित एक टाउनशिप प्रकल्प उभारण्यास सुरुवात केलीय. मात्र या जाहिरातीनंतर धार्मिक धुव्रीकरण आणि भेदभावाच्या मुद्द्यावरून वाद पेटलाय... राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं याप्रकरणी राज्य सरकारला नोटीस पाठवलीय... नेमकं प्रकरण काय?
कर्जतमधील प्रकल्पाला रेराकडून मंजुरी देण्यात आलीय.
मात्र टाऊनशिप प्रकल्प फक्त मुस्लिम लोकांसाठी असल्याचा जाहिरातीतून प्रचार करण्यात आलाय.
त्यामुळे धार्मिक ध्रुवीकरण आणि संविधानातील समानतेच्या तरतुदीचे उल्लंघन झाल्याची तक्रार करण्यात आली. त्याआधारे राष्ट्रीय मानवधिकार आयोगाकडून टाऊनशिप प्रकल्पाला नोटीस देण्यात आलीय. त्याआधारेच राज्य सरकारकडून अहवाल मागवलाय. कोणत्या तरतुदींआधारे प्रकल्पाला मान्यता देण्यात आली, याचाही तपास सुरु आहे.
याआधी मांसाहारावरुन गृहप्रकल्पात घरे नाकारल्याच्या घटना घडल्या आहेत. धर्माच्या, जातीच्या आधारावर सोसायटीत राहण्याची परवानगी देणाऱ्यावरून वाद निर्माण झाले आहेत. त्यात आता थेट धर्माच्या आधारावर अशा प्रकारच्या टाऊनशिप उभ्या राहत असतील. तर य़ा प्रकल्पांना मंजुरी कशी देण्यात आली? संविधानाची पायमल्ली करणाऱ्या या प्रकल्पांवर याआधी सरकारनं लक्ष का ठेवलं नाही, असे अनेक प्रश्न निर्माण होतायत..
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.