Akola: महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्याला पदावरून हटवले; डॉ. हुसेन यांच्या नावावर शिक्कामोर्तब

अकोला महापालिकेचे विरोधी पक्षनेता तथा काँग्रेसचे गटनेता साजिद खान पठाण यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली
Akola: महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्याला पदावरून हटवले; डॉ. हुसेन यांच्या नावावर शिक्कामोर्तब
Akola: महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्याला पदावरून हटवले; डॉ. हुसेन यांच्या नावावर शिक्कामोर्तबजयेश गावंडे
Published On

अकोला: अकोला (Akola) महापालिकेचे (Municipal Corporation) विरोधी पक्षनेता तथा काँग्रेसचे (Congress) गटनेता साजिद खान पठाण यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. प्रभाग रचनेवर आक्षेप घेत साजिद खान यांनी महापालिकेच्या २ अधिकाऱ्यांना डांबले होते. या वर्तणुकीवरून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. (Municipal Corporation Opposition Leader removed from office)

हे देखील पहा-

यामुळे महापालिका (Municipal Corporation) विरोधी पक्षनेते पदी नगरसेवक (Corporator) डॉ. झिशान हुसेन यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. मनपा निवडणूकीच्या (election) संदर्भाने महापालिकेची प्रभाग रचना जाहीर करण्यात आली होती. दरम्यान ही प्रभाग रचना भाजपच्या इशाऱ्याने झाली असल्याचा आरोप (Allegations) करत पठाण यांनी महापालिकेच्या २ अधिकाऱ्यांना दालनात बोलावून त्यांच्याशी अर्वाच्च भाषेत बोलून त्यांना डांबून ठेवल्याचा आरोप साजिद खान यांच्यावर होता.

Akola: महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्याला पदावरून हटवले; डॉ. हुसेन यांच्या नावावर शिक्कामोर्तब
Petrol Bomb: भाजप कार्यालयावर मध्यरात्रीच्या सुमारास पेट्रोल बॉम्ब हल्ला

दरम्यान याप्रकरणी साजिद खान पठाण यांच्या गुन्हा दाखल करण्यात आला होता. काल याप्रकरणी सिटी कोतवाली पोलिसांनी पठाण यांना ताब्यात घेतले होते. त्यामुळे या प्रकरणी गंभीर दखल घेत. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी साजिद खान पठाण यांची उचलबांगडी करत त्यांच्या जागी डॉ. झीशन हुसेन यांचे नाव निश्चित केले आहे. तसेच महापौर आणि आयुक्तांना (Commissioner) पत्राद्वारे कळविण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com