ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी सांगलीमध्ये करण्यात आले मुंडन आंदोलन
ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी सांगलीमध्ये करण्यात आले मुंडन आंदोलनविजय पाटील

ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी सांगलीमध्ये करण्यात आले मुंडन आंदोलन

ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळावे या मागणीसाठी सांगलीमध्ये आज ओबीसी हक्क परिषदेच्या वतीने मुंडन करत आंदोलन करण्यात आले आहे.
Published on

सांगली : ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळावे या मागणीसाठी सांगलीमध्ये आज ओबीसी हक्क परिषदेच्या वतीने मुंडन करत आंदोलन करण्यात आले आहे. राज्य सरकारने तातडीने राजकीय आरक्षण लागू करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. सरकारकडून याबाबत तातडीने कार्यवाही न झाल्यास विधानभवनावर धडक देण्याचा निर्धार यावेळी जाहीर करण्यात आला. (Mundan agitation was held in Sangli demanding OBC reservation)

हे देखील पहा -

सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर ओबीसी हक्क परिषदेच्या वतीने सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर या मोर्चाच्या माध्यमातून सहभागी झालेल्या अनेक ओबीसी समाजातील कार्यकर्त्यांनी मुंडन करत राज्य सरकारच्या ओबीसी आरक्षण धोरणाचा निषेध नोंदवला आहे.

ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी सांगलीमध्ये करण्यात आले मुंडन आंदोलन
मुसळधार पावसाचा पोलिस ठाण्याला फटका, पाणी शिरल्याने कामकाज ठप्प!

54 टक्के इतका ओबीसी समाज असताना देखील समाजाचे राजकीय आरक्षण काढून घेतल्याने ओबीसी समाज हा मुख्य प्रवाहापासून बाजूला जाण्याची भीती यावेळी व्यक्त करत राज्य शासनाने याबाबत तातडीची पाऊले उचलावी आणि ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण पुन्हा लागू करावे अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com