मुंबई उपनगर: रात्री 10 वाजल्या पासून मुसळधार पाऊस (Maharashtra Heavy Rain) पडत आहे त्यामुळे मुंबईत उपनगरात (Mumbai Suburban) पाणी साचले आहे भांडुप सोणापुर येथे देखील पाणी साचले असून रस्त्यांना नदीचं स्वरूप आलं आहे. याठिकाणी भंगार दुकानातील सामान वाहून गेले आहे. फ्रीज तसेच अनेक वस्तू वाहून गेल्या आहेत.
ठाणे: शहरात (Thane City) कल रात्री पासून पावसाचा जोर वाढल्यानंतर पहाटेच्या सुमारास जोर अधिक वाढला. आता जोर कमी झाला आहे. शहरात एकूण 18 ठिकाणी पाणी साचलं होत. शहरातील सखल भागात पाणी साचल्यामुळे नागरिकांच्या घरात देखील पाणी साचलं होत. ठाण्यातील लोकमान्य नगर, आंबेडकर रोड, पाचपाखडी, किसन नगर या ठिकाणी पाणी साचलं होत. पहाटे पाच वाजेपर्यंत 182 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. उल्हासनगर मध्ये रात्री पाऊस होता मात्र आता सध्यातरी पावसाचा जोर कमी झाला आहे. पालघरमध्ये रात्री पाऊस होता. सध्या पाऊसाने माघार घेलली आहे.
रत्नागिरीत: सध्या मुसळधार पाऊस कोसळतोय काल दुपारनंतर पावसाला जोरदार सुरुवात झाली. अद्यापही पावसाची संतधार सुरुच आहे. मध्यरात्री नंतर थोडी विश्रांती घेतली होती मात्र पहाटेनंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. या पडणा-या पावसामुळे चिपळूणच्या वशिष्ठी नदिच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. चिपळूण शहरातील जुन्या बाजारपुलाला रात्री पाणी लागल होतं. (Konkan Coast Area)
ठाण्यातील कळवा आणि मुंब्रा या भागात काल मध्यरात्री पावसाने दमदार हजेरी लावली होती. यावेळी मुंब्रा येथील कादर पॅलेस रोड वर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्याच प्रमाणे कळवा येथील सत्यम शिवम सोसायटी आणि कळवा रेल्वे स्टेशन जवळील गावदेवी मंदिर परिसरात पाणी साचले होते. यात कुठलीही जीवित हानी झालेली नाही. रात्रभर जोरदार पाऊस कोसळल्यानंतर पहाटेच्या सुमारास मात्र पावसाने विश्रांती घेतली आहे.
मुंबईसह इतर ठिकाणी झालेल्या मुसळधार पावसाने रेल्वेचं वेळापञक डगमगलं आहे. मध्य आणि हार्बर मार्गावर अनेक स्थानकांवर रेल्वे रुळ जलमय झाले आहेत. ठाणे /कल्याण, कर्जत/ खोपोली, कसारा सेक्शन, वाशी / पनवेल, ट्रान्स हार्बर लाइन, नेरूळ/बेलापूर, खारकोपर लाइन वरील गाड्या कार्यरत, तर एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापञकात बदल करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली.
पालघर: पालघर जिल्ह्यात रात्री मुसळधार पाऊस पडला असून आता पावसाने काहीशी उसंती घेतली तर रात्रभर पडणाऱ्या पावसामुळं सखल भागात पाणी साचलेलं पाहायला मिळालं.पालघर -बोईसर रस्त्यावरील सारवली खाडी जवळ रस्त्यावरून पाणी साचल आहे तर वाणगाव वाढवन रस्त्यांवर पाणी साचल्याने रस्ते वाहतूक काहीवेळ खोळंबलेली पाहायला मिळाली. जिल्ह्यात कुठेही जीवितहानी झाली नाही रात्रभर जोरदार पाऊस कोसळल्यानंतर पहाटेच्या सुमारास पावसाने विश्रांती घेतली आहे.
Edited By: Pravin Dhamale
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.