Chhagan Bhujbal: 'मराठा आरक्षणाची अधिसूचना रद्द करा...' ओबीसी नेते आक्रमक; २ तासांच्या बैठकीत काय घडलं?

OBC Leaders Meeting: मराठा आरक्षणाच्या निर्णयाविरोधात ओबीसी नेते आक्रमक झाले आहेत. आज राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या सिद्धगड निवासस्थानी ओबीसी नेत्यांची बैठक पार पडली.
Manoj Jarange vs Chhagan Bhujbal Latest News
Manoj Jarange vs Chhagan Bhujbal Latest News Saam Tv
Published On

रुपाली बडवे, मुंबई|ता. २८ जानेवारी २०२४

Chhagan Bhujbal Press Conference:

मराठा आरक्षणाच्या निर्णयाविरोधात ओबीसी नेते आक्रमक झाले आहेत. आज राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या सिद्धगड निवासस्थानी ओबीसी नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला मंत्री छगन भुजबळ, माजी मंत्री राम शिंदे, आ. गोपीचंद पडळकर, मा. आ. नारायण मुंडे, मा.खा. समीर भुजबळ, मा. आ. पंकज भुजबळ यांच्यासह विविध संघटना आणि समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत ओबीसी नेत्यांनी सरकारवर नाराजी व्यक्त केली असून न्यायालयीन लढाई लढणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

काय म्हणाले छगन भुजबळ?

"मराठा समाजाला (Maratha Reservation) आरक्षण देण्याबाबत आमचा विरोध नव्हता. मात्र आमच्या भटक्या विमुक्त लेकरांचा घास काढून घेतला जातोय, त्यांचा संताप आहे. आम्हाला २७ टक्के आरक्षण जाहीर झालं. ते पूर्ण मिळालेलं नाही. ओबीसीला धक्का लावणार नाही, असं म्हणता आणि बॅक डोरने इंट्री केली. आमच्या लेकरांच्या तोंडचा घास पळवला जातोय," असे छगन भुजबळ म्हणाले.

डबल आरक्षण देताय..

"मराठा बांधव आता कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसीत सामील होणार आहेत. ओबीसी आयोग हा मराठा आयोग झाला. मागासवर्ग आयोगात कोणत्या जातीशी संबंधित नसलेला व्यक्ती समितीत नसावा, पण न्यायमुर्ती सुप्रे हे सगळ्या समितीवर आहेत. असे म्हणत वेगळ आरक्षणासोबत कुणबी प्रमाणपत्र देऊन डबल आरक्षण देताय," असा आरोप छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Manoj Jarange vs Chhagan Bhujbal Latest News
CM Eknath Shinde News: मराठा समाजाने अनेक नेत्यांना मोठं केल, पण..., आरक्षणाच्या मुद्द्यावरून CM एकनाथ शिंदेचं टीकास्त्र

तीन ठराव संमत..

"बैठकीत बऱ्याच विषयांवर चर्चा झाली. दुःख, संताप व्यक्त करण्यात आला. सरकारने मराठा आरक्षणाबाबत सगेसोयरे काढलेला मसुदा रद्द करण्यात यावा, शिंदे समिती असंवैधानिक, कुणबी प्रमाणपत्राला स्थगित देण्यात यावी आणि राज्य मागासवर्गीय आयोग आणि शिंदे समिती रद्द करण्यात यावी, हे तीन ठराव संमत करण्यात आल्याचेही छगन भुजबळ यांनी सांगितले आहे. तसेच १६ फेब्रुवारीपर्यंत आम्ही लाखोंनी हरकती दाखल करणार असून ३ फेब्रुवारी रोजी नगरला ओबीसी मेळावा आयोजित केला आहे, त्यात सहभागी व्हा" असे आवाहनही भुजबळांनी केले. (Latest Marathi News)

Manoj Jarange vs Chhagan Bhujbal Latest News
Pratapgad Fort : 'प्रतापगड हा महाराजांच्या शौर्याचे प्रतिक', मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची किल्ले प्रतापगडाला भेट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com