Mumbai News: राज्य सरकारचं दिवाळी गिफ्ट! ३ हजार अंगणवाडी मदतनीसांना मिळणार पदोन्नती; CM शिंदेंची मोठी घोषणा

CM Eknath Shinde: राज्यातील तीन हजार अंगणवाडी मदतनीस यांना अंगणवाडीसेविका पदावर पदोन्नती देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
CM Eknath Shinde
CM Eknath ShindeSaamtv
Published On

Anganwadi Workers: 

राज्यातील अंगणवाडी सेविकांसाठी एक महत्वाची अन् आनंदाची बातमी. दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर आला असतानाच केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी मोठा निर्णय घेत आशा सेविकांची दिवाळी गोड केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते राज्यातील प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेतील ८ लाख १४ हजार मातांना ३२१ कोटी ५७ लाख रूपयांचे ऑनलाईन वाटप करण्यात आले. यावेळी राज्यातील तीन हजार अंगणवाडी मदतनीस यांना अंगणवाडीसेविका पदावर पदोन्नती देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

यशवंतराव चव्हाण सेंटर येथे केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाच्यावतीने आयोजित 'प्रधानमंत्री मातृवंदना कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. मुंजपरा महेंद्रभाई, कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे, आमदार आशिष शेलार, आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना "नवरात्र संपल्यानंतर मातेला वंदन करण्याचा हा कार्यक्रम आहे. महिला या मातृशक्ती असून समाज, नवीन पिढी घडविण्याचे काम करीत असल्याने ती आदिशक्तीही आहे. केंद्र सरकारच्या मदतीने महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी राज्य सरकार तत्पर असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

CM Eknath Shinde
Ahmednagar News: शेततळ्यात बुडून सख्ख्या बहिण भावाचा मृत्यू; मन सुन्न करणाऱ्या घटनेने नगर हळहळलं

स्मृती इराणींची मोठी घोषणा...

कार्यक्रमात बोलताना"राज्यातील तीन हजार अंगणवाडी मदतनीसांच्या पदोन्नतीसाठीची कार्यवाही लवकरच पूर्ण केली जाईल.. अशी घोषणा केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी केली.

तसेच अंगणवाडी सेविकांना मोबाईल फोन खरेदीसाठी १२८०० रुपये देण्यात येणार असून अंगणवाडी ताईंच्या सुरक्षिततेसाठी प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजनेचा हप्ता केंद्र शासन भरेल. अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या कौशल्य विकासासाठी केंद्र शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असेही त्यांनी सांगितले. (Latest Marathi News)

CM Eknath Shinde
Ahmednagar News: शेततळ्यात बुडून सख्ख्या बहिण भावाचा मृत्यू; मन सुन्न करणाऱ्या घटनेने नगर हळहळलं

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com