Mumbai Crime : होळीचे पैसे देण्यास उशीर, तृतीयपंथीयांचा राडा; पैशांसाठी पाणीपुरीवाल्याच्या गाळ्याचं नुकसान

Mumbai Malad Assault by Transgender People : मालाड पश्चिम परिसरात असलेल्या गुप्ता नावाच्या पाणीपुरी विक्रेत्याच्या स्टॉलवर ७ मार्च रोजी चार ते पाच तृतीयपंथी होळीसाठी पैसे मागण्यासाठी गेले.
Malad Panipuri Luggage Shop damaged
Malad Panipuri Luggage Shop damagedSaam Tv News
Published On

मुंबई : मुंबईच्या मालाड पश्चिमेतील एका पाणीपुरीवाल्याच्या गाळ्यावर तृतीयपंथीयांकडून मारहाण आणि दुकानाच्या सामानाची नासधूस केल्याचा एक व्हिडिओ सोशल माध्यमात चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये चार ते पाच तृतीयपंथी दुकानातील सामान फेकताना आणि शिवीगाळ करताना दिसून येत आहे. मात्र, पाणीपुरी स्टॉल धारकाने देखील बांबू घेऊन या तृतीयपंथीयांना चांगलीच मारहाण केल्याचं आपण व्हिडिओमध्ये पाहू शकतो.

दुकानदाराने केलेल्या मारहाणीनंतर सर्व तृतीयपंथी या ठिकाणावरून पळून गेले. या प्रकरणी दुकानदार आणि तृतीयपंथी हे मालाड पोलीस ठाण्यामध्ये तक्रार करण्यासाठी गेले, मात्र त्या ठिकाणी दोन्ही बाजूंकडून समजोता झाल्यामुळे पोलिसांनी कोणताही गुन्हा दाखल केला नसल्याची माहिती मिळत आहे.

Malad Panipuri Luggage Shop damaged
Satish Bhosale: माज उतरवला! खोक्याच्या घरावर बुलडोझर, वनविभागाचा दणका

मिळालेल्या माहितीनुसार, मालाड पश्चिम परिसरात असलेल्या गुप्ता नावाच्या पाणीपुरी विक्रेत्याच्या स्टॉलवर ७ मार्च रोजी चार ते पाच तृतीयपंथी होळीसाठी पैसे मागण्यासाठी गेले. मात्र, दुकानावर ग्राहकांची गर्दी असल्यामुळे दुकानदाराकडून तृतीयपंथी यांना पैसे देण्यास उशीर झाला यामुळे तृतीयपंथीयांनी दुकानदारास पैसे लवकर देण्यास सांगितलं. दुकानदाराने थोडं थांबण्याची विनंती केली, पण तृतीयपंथीयांनी काहीही ऐकून न घेता पाणीपुरीच्या स्टॉलवरील सामान फेकण्यास सुरुवात केली. दुकानातील वस्तू आणि सामान तृतीय पंथीयांकडून फेकण्यात आल्यामुळे दुकानदाराचं मोठं नुकसान झालं. याचा राग आल्याने दुकानदाराने बांबू घेऊन या सर्व तृतीयपंथीयांना चांगलेच झोडपून काढलेय. त्यानंतर या सर्वांनी या ठिकाणावरून पळ काढला.

यानंतर तृतीयपंथीय मारहाण झाली म्हणून मालाड पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले. त्याच वेळेस दुकानदार देखील आपली तक्रार देण्यासाठी त्या ठिकाणी आला. मात्र पोलिसांनी त्यांना आपसात प्रकरण मिटवून घेण्यास सांगितलं. त्यामुळे या मारहाणी प्रकरणी कोणताही गुन्हा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेला नाही.

Malad Panipuri Luggage Shop damaged
Mumbai Crime : जुन्या वादातून मित्रानेच केला घात! चेंबूर हत्याकांडाचा उलगडा, हत्येचा थरार CCTVमध्ये कैद

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com