

Andheri News: दहशतवादी हल्ल्याच्या तयारीत असलेल्या ६ जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या ६ जणांकडे बॉम्ब बनवण्याचे साहित्य आढळून आले होते. मंत्री, पोलीस ऑफिसर यांना विविध धमक्यांचे फोन येत आहेत. या सर्वांमुळे सामान्य जनता देखील भयभीत झालेली असताना आता अंधेरीतून आणखी दोन जणांना ताब्यत घेण्यात आलं आहे. (Latest Marathi News)
अंधेरी डी एन नगर परिसरात घातक अग्निशस्त्रासह दोघांना अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा ९ ची मोठी कारवाई आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या दोघांकडून २ अग्निशस्त्र आणि २३ जिवंत काडतूस यासह धारदार चाकू आणि इतर साहित्य जप्त केले आहे.
अरबाज खान, ताशी हुसेन खान अशी अटक केलेल्या दोन्ही आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी डी एन नगर पोलीस ठाण्यात दोघांवर हत्यार बंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे संपूर्ण प्रकरण अधिक तपासासाठी पोलिसांनी गुन्हे शाखा नऊकडे वर्ग केलं आहे.
मुंबईवरील हल्ल्याचा कट उधळला; ६ जणांना अटक
आयसीसच्या महाराष्ट्र मॉड्युल प्रकरणी (Maharashtra ISIS Module Case) अटक करण्यात आलेले दहशतवादी मुंबईत कारवाया करण्याच्या तयारीमध्ये होते पण त्यापूर्वीच रविवारी त्यांना अटक करण्यात आली. एनआयएच्या वकिलांनी कोर्टात हा मोठा दावा केला आहे. या प्रकरणात आतापर्यंत ६ जणांना एटीएसने (ATS) अटक केली आहे.
अटक करण्यात आलेले दहशतवादी पुण्याच्या कोंढव्या भागामध्ये राहायचे. त्याच ठिकाणी दहशतवाद्यांना बॉम्ब तयार करण्यासाठी प्रशिक्षण शिबिर (Bomb Making Training) आयोजित करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एटीएसच्या (ATS) तपासातून हे उघड झाले असून बॉम्ब तयार करण्यासाठीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.